Menu Close

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने विविध ठिकाणी रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न !

हिंदू जनजातिती समितीच्या वतीने देशातील विविध राज्यांत व शहरांत रक्षाबंधनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, शासकीय अधिकारी तसेच हिंदुत्वनिष्ठांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्र व धर्माच्या रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आणि समाजात राष्ट्र, धर्म व संस्कृतीविषयी जाग्रुकतेचा संदेश देण्यात आला.

गोवा

गोव्यात धर्मांतर विरोधी कायदा मंजूर होणे हीच आमच्यासाठी रक्षाबंधनाची भेट ठरेल – हिंदू जनजातिती समितीच्या साधिक्यांची रक्षाबंधनानिमित्त मंत्री आणि आमदारांकडे मागणी.

साखळी येथे गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना राखी बांधताना सनातन संस्थेच्या साधिका—डावीकडून सौ. लता किल्लेकर आणि सौ. गिरिजा गावकर
नावेलीचे भाजपचे आमदार उल्हास तुयेकर यांना राखी बांधतांना सौ. गीता कवळेकर

पुणे

हिंदू जनजागृती समितीच्या सुश्री प्राची शिंत्रे यांनी पुणे येथे सामाजिक आणि राजकीय विश्लेषक श्री. सर्वेश मेहेंदळे यांना राखी बांधली आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरी

निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना राखी बांधतांना सौ. मधुरा खेराडे
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना राखी बांधतांना सौ. शुभांगी मुळ्ये.

चिपळूण

चिपळूण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रकाश बेले यांना राखी बांधतांना सौ. प्रिया अष्टेकर.
चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. संजय जाधव यांना राखी बांधतांना सौ. प्रिया अष्टेकर आणि सोबत समितीचे श्री. जयवंत शिंदे

Latest News