हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यापासून सावध करणे, ही काळाची आवश्यकता ! – अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी

दापोली – ‘लव्ह जिहाद’चे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये लाखो हिंदु मुलींची फसवणूक होत आहे. हिंदु मुलींना वाचवण्यासाठी या षड्यंत्राविषयी सावध करणे, ही काळाची आवश्यकता बनली आहे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी यांनी केले. त्या तालुक्यातील किन्हळ येथे आयोजित ‘बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित’ अभियानांतर्गत ‘लव्ह जिहाद’ या विषयावर बोलत होत्या.

अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी म्हणाल्या की, लव्ह जिहादमुळे हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होते. त्यांना नरकयातना भोगाव्या लागतात. या षड्यंत्राच्या मागे कोणत्याही प्रकारचे प्रेम नसून केवळ हिंदु मुलींचे धर्मांतर करणे आणि धर्मांधांची लोकसंख्या वाढवणे, हेच कारस्थान आहे. या संकटाविषयी आपल्या मुलींना जागरूक आणि सतर्क करणे आवश्यक असून हे आपले प्रत्येकाचे दायित्व आहे.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. परेश गुजराथी यांनी सांगितले की, आपल्या मुलांसमवेत आपला धर्म, आपले संस्कार यांची शिदोरी असेल, तर ते अन्य धर्मियांच्या आमिषांना बळी पडणार नाहीत. यासाठी आपल्या मुलींना धर्मशिक्षित करणे सुसंस्कारित बनवणे आवश्यक आहे, तर आणि तरच आपण या जिहादी संकटाला सामोरे जाऊ शकतो.
लव्ह जिहाद या संकटावरील आध्यात्मिक स्तरावरील उपायांमध्ये कुलदेवतेचा नामजप कसा कार्य करतो ? त्याचे महत्त्व काय ? हे समितीचे श्री. चंद्रकांत उजाळ यांनी स्पष्ट केले.
अभिप्राय
श्री. प्रशांत चिपटे, सचिव, ग्रामविकास मंडळ, किन्हळ : आजचा विषय म्हणजे आम्हा हिंदूंचे संरक्षण आहे. याची जागृती सर्वत्र होणे आवश्यक आहे.







