Menu Close

देहलीमध्ये मुस्कान नावाच्या हिंदु तरुणीची इम्रान याच्याकडून घरात घुसून हत्या

लग्नाला नकार दिल्याने इम्रान याने हत्या केल्याचे उघड

नवी देहली – टिळक नगर परिसरात २६ ऑगस्टला संध्याकाळी मुस्कान (वय २१ वर्षे) या तरुणीची इम्रान याने घरात घुसून चाकूने भोसकून हत्या केली. इम्रान  व्यायामशाळेच्या प्रशिक्षक (‘जिम ट्रेनर’) आहे. हत्येनंतर तो पसार झाला आहे. घटनेच्या वेळी मुस्कान घरात एकटी होती. लग्नाला नकार दिल्याने इम्रान याने तिची हत्या केली.

१. पोलिसांच्या माहितीनुसार मुस्कानचे कुटुंबीय बाहेर गेले असतांना इम्रान घरात घुसला आणि त्याने तिच्यावर चाकूने आक्रमण केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अन्वेषण चालू केले. आरोपीच्या शोधासाठी परिसरातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍यांची चित्रीकरण पडताळले जात असून तो घरात कसा घुसला ? आणि हत्येनंतर कोणत्या मार्गाने पसार झाला ?, यांचा शोध घेतला जात आहे.

२. मुस्कान विद्यार्थिनी असून ती अर्धवेळ (पार्टटाइम) ‘मॉडेलिंग’ करत होती. तिच्या मित्राच्या म्हणण्यानुसार इम्रान तिच्या जिममध्ये ट्रेनर होता. तो काही काळापासून मुस्कानचा पाठलाग करत होता आणि तिच्यावर लग्नासाठी दबाव आणत होता. मुस्कान त्याच्याशी बोलत नसल्याने तो तिला त्रास देत असल्याचा आरोपही मित्राने केला आहे. अतिरिक्त पोलीस उपायुक्त अभिषेक गुप्ता यांनी आरोपीचा शोध चालू असल्याचे सांगितले.

मुसलमानांकडून लव्ह जिहादद्वारे हिंदु तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त केले जाते आणि लग्नाला नकार दिला, तर हत्या करून आयुष्य संपवले जाते ! हे आणखी किती दिवस चालू रहाणार आहे ? – संपादक, हिंदू जनजागृती समिती
पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदु तरुण कधीतरी मुसलमान तरुणीवर प्रेम करून तिच्याशी विवाह करू शकतो का ? – संपादक, हिंदू जनजागृती समिती

Read more on Love Jihad

Latest News