Menu Close

यवतमाळ जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकित हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय

बैठकीत उपस्थित अधिवक्त्यांनी समितीला सर्वतोपरी न्यायालयीन साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले, तसेच प्रत्येक मासातून एकदा बैठक घेण्याचे ठरवण्यात आले.

महिलांनी पाल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याप्रमाणे संस्कार करावेत – सौ. नयना भगत

तरुणांनी चित्रपटांतील अभिनेते-अभिनेत्रींचा नव्हे, तर शूर-वीर क्रांतीकारकांचा आदर्श समोर ठेवायला हवा. त्यासाठी महिलांनी माता जिजाऊंप्रमाणे धर्माचरणी होऊन पाल्यांना घडवावे.

शिवबाराजे प्रतिष्ठानचे ५०० कार्यकर्ते सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेला येणार !

शिवबाराजे प्रतिष्ठानच्या बैठकीत अमित कदम आणि अर्जुन साळुंके यांनी सोलापूर येथे ७ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.

पद्मावत चित्रपटाच्या विरोधात करणी सेनेच्या वतीने पुण्यात मोर्चा

पद्मावत चित्रपटाच्या विरोधात करणी सेनेने पुण्यात २२ जानेवारीला चेतावणी मोर्चा काढला. या मोर्च्याला ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

देशाची अखंडता राखण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा करा !

हिंदूंच्याच धार्मिक उत्सवांच्या वेळी करण्यात येणारी अतिरिक्त भाडे ही अन्यायकारक आणि धार्मिक भेदभाव करणारी असल्याने ती तात्काळ रहित करावी …

भिवंडी येथे भागवत सप्ताहातील २ सहस्र लोकांपर्यंत हिंदु धर्मजागृती सभेचा विषय पोहोचला

ब्रह्मानंद नगर येथील भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमात येथे होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यात आले. या भागवत सप्ताहामध्ये २ सहस्रांहून अधिक भाविक उपस्थित होते.

७ फेब्रुवारीच्या हिंदु धर्मजागृती सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचा राळेरास (जिल्हा सोलापूर) येथील गावकर्‍यांचा निर्धार !

हिंदूंवरील आघातांविषयी समाजाला माहिती व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम यांची ज्योत प्रज्वलित होऊन हिंदूसंघटन व्हावे, या उद्देशाने सभेचे आयोजन केले होते.

जम्मू येथे काश्मिरी हिंदूंच्या ‘वंशविच्छेद दिना’निमित्त विस्थापित काश्मिरी हिंदूंची निदर्शने

जम्मू येथे रहात असलेल्या निर्वासित काश्मिरी हिंदूंनी २८ वर्षांपूर्वी काश्मीर खोर्‍यात झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेद दिनानिमित्त येथील राज्यपालांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

डॉ. भारत पाटणकर यांनी आंदोलन छेडल्यास ‘जशास तसे’ उत्तर देणार ! – हिदुत्वनिष्ठांची चेतावणी

पुरोगामी डॉ. भारत पाटणकर यांच्या ‘आद्य गणमाता अंबाबाई मुक्ती’ आंदोलनाच्या बैठकीवर बंदी घालून त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल….

कराड येथे ‘लव्ह जिहाद निषेध जनजागृती पदयात्रे’ला अनुमती मिळण्यासाठी ‘हिंदू एकता आंदोलन’च्या कार्यकर्त्यांचे लाक्षणिक उपोषण

२० आणि २१ जानेवारीला हिंदू एकता आंदोलनच्या वतीने आयोजित केलेल्या पदयात्रेस कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचे कारण देऊन पोलिसांनी अनुमती नाकारली होती.