Menu Close

जळगाव येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात केलेल्या प्रबोधनाला युवक-युवती यांचा सकारात्मक प्रतिसाद

प्रबोधन मोहिमेत सहभागी धर्मप्रेमी

जळगाव : येथील मूळजी जेठा महाविद्यालयासमोर १४ फेब्रुवारी या दिवशी बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात तरुणांचे प्रबोधन करण्यात आले. या वेळी पत्रकांद्वारे प्रबोधन करण्यात आले. त्याला वृद्धांसह महाविद्यालयीन युवक-युवतींनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. काही युवतींनी व्हॅलेंटाईन डे म्हणजे थोतांड असल्याचे सांगितले. या वेळी १०० हून अधिक युवक-युवतींनी आम्हीही व्हॅलेंटाईन डे साजरा करत नाही आणि इतरांनाही करू देणार नाही, असे सांगितले. अनेकांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.

यात बजरंग दल महानगर संयोजक श्री. समाधान पाटील, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *