Menu Close

मुसलमान दफनभूमीतील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदन

असे निवेदन का द्यावे लागते ? अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाने स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

(१) नायब तहसीलदार मोहिते यांना निवेदन देतांना कार्यकर्ते

तुळजापूर : घाटशिळ रोड (मौजे तुळजापूर) येथे असलेल्या मुसलमान दफनभूमीत सुशोभीकरणाच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचे बांधकाम किंवा पत्र्याचे शेड उभारू नये. तेथे मोठ्या प्रमाणात झालेले अनधिकृत बांधकाम हटवण्यात यावे अन्यथा विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि तुळजापूरवासीय यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन येथील बजरंग दलाच्या वतीने नायब तहसीलदार मोहिते आणि नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक सोनार यांना देण्यात आले.

या वेळी बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक अर्जुन (आप्पा) साळुंके, हिंदु जनजागृती समितीचे अमित कदम, तसेच बजरंग दल, शंभुराजे प्रतिष्ठान, जय श्रीराम प्रतिष्ठान, झुंजार प्रतिष्ठान, जाणता राजा प्रतिष्ठान यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नितीन घट्टे, रोहित भांजी, जीवनराजे इंगळे, विकी वाघमारे, रोहित चव्हाण, अलोक शिंदे, कुमार टोले, दत्ता सोमजी, सुदर्शन वाघमारे उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *