जंतर-मंतरवर हिंदू देवांचा अपमान आणि ‘हेट स्पीच’

नवी दिल्ली : जंतर-मंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली नीट (NEET) मुद्द्यावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या मंचावरून जाहीरपणे सनातन धर्माचा अपमान आणि राष्ट्रविरोधी कारवायांना प्रोत्साहन देण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याविरोधात आज सुप्रीम कोर्टाचे वकील आणि ‘हिंदू जनजागृती समिती’च्या एका संयुक्त शिष्टमंडळाने नवी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत एफआयआर (FIR) नोंदवण्याची मागणी केली आहे.
Hindu Gods mocked at CJP stage!
Kunal Kamra mocks Prabhu Shri Ram and Maa Sita, says
“Sita ke pati ka naam le lekar
Nita ke pati ka kaam kar rahe hai…” pic.twitter.com/b5b98Q3NEY— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) July 15, 2026
ही तक्रार संसद मार्ग पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार (SHO) यांना प्रत्यक्षपणे सुपूर्द करण्यात आली. तक्रार दाखल करणाऱ्या या शिष्टमंडळात सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील ॲड. मकरंद डी. अडकर, ॲड. अमिता सचदेवा, ॲड. मयंक द्विवेदी, ॲड. अतुल शर्मा, ॲड. पार्थ यादव, ॲड. यादवेन्द्र सक्सेना, ॲड. केशरी सत्या तसेच हिंदू जनजागृती समितीचे प्रतिनिधी श्री. कार्तिक साळुंखे आणि श्री. श्रीराम लुकतुके उपस्थित होते.

तक्रारीत म्हटले आहे की,
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने मंचावरून ‘‘हे सरकार अनेक वर्षांपासून सीतेच्या पतीचे (रामाचे) नाव घेऊन नीताच्या पतीचे (मुकेश अंबानींचे) काम करत आहे’’ अशी आक्षेपार्ह आणि अपमानकारक टिप्पणी करून १०० कोटी हिंदूंच्या आस्थेला ठेच पोहोचवली आहे. मंचावरून एका महिलेने ‘‘सब बुत (मूर्ती) उठवाए जाएंगे… बस नाम रहेगा अल्लाह का’’ हे गाणे गायले, जे थेट सनातन धर्मातील मूर्तीपूजा संपवण्याची एक भडकाऊ आणि हिंसक घोषणा आहे. या विद्यार्थी मंचावर ‘सिमी’ (SIMI), ज्या संघटनेवर भारत सरकारने दहशतवादी कारवायांमुळे बंदी घातली आहे, तिचा माजी सदस्य आणि दिल्ली दंगलीचा आरोपी उमर खालिदचा वडील सय्यद कासिम रसूल इलियास उपस्थित होता. अभिनेता प्रकाश राज याने मंचावरून तरुणांना भडकवताना ‘‘दहशतवादी आणि पाकिस्तानी’’ शब्दांचे उदात्तीकरण केले आणि तरुणांना व्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी चिथावणी दिली.
या शिष्टमंडळाने स्पष्ट केले की, हा विद्यार्थ्यांचा नाही, तर डाव्या आणि कट्टरपंथी इस्लामी लोकांचा देशविरोधी अजेंडा आहे. शिष्टमंडळाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने ‘हेट स्पीच’ (शाहीन अब्दुल्ला विरुद्ध भारत सरकार) प्रकरणात दिलेल्या ऐतिहासिक निकालाचा हवाला देत, पोलिसांनी त्यानुसार स्वतःहून दखल (Suo Motu) घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. वकील आणि समितीने या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS, २०२३) च्या कलम २९९, १९६, १५२ आणि ३५३ अंतर्गत एफआयआर (प्राथमिकी) नोंदवण्याची मागणी केली आहे. यासोबतच, या संपूर्ण आंदोलनाचे फंडिंग आणि सिमीशी असलेले लागेबांधे लक्षात घेता ‘युएपीए’ (UAPA) अंतर्गत देखील चौकशी करण्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्री आणि दिल्ली पोलीस आयुक्तांना करण्यात आले आहे.
वकील अमिता सचदेवा आणि वकील प्रदीप नाईक यांच्याकडून कुणाल कामराला नोटीस
वकील प्रदीप नाईक यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की,
या विधानामुळे समस्त हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून समाजात द्वेष आणि तणाव पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कुणाल कामराला मुख्य आरोपी करण्यात आले असून घटनास्थळी उपस्थित असलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांच्या भूमिकेचीही स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या व्हिडिओची डिजिटल फॉरेन्सिक तपासणी करून त्याची मूळ प्रत जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वकील अमिता सचदेवा यांनी पाठवलेली नोटीस
🛑 LEGAL NOTICE
To,
Mr. Kunal Kamra
Comedian
X Handle: @kunalkamra88Subject: Legal Notice for Immediate Removal of Derogatory Video, Public Apology, and Cessation of Further Acts Outraging Hindu Religious Sentiments, Failing Which Legal Proceedings Shall Be Initiated.
Mr.… pic.twitter.com/nicJWGOWFS
— Amita Sachdeva, Advocate (@SachdevaAmita) July 16, 2026







