Menu Close

मंदिरांच्या जत्रा, उत्सव यांमध्ये हिंदूंखेरीज इतरांना दुकाने लावण्यास अनुमती देऊ नका !

‘कर्नाटक देवस्थान-मठ आणि धार्मिक संस्था महासंघा’ची बेंगळुरू जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

श्री. मोहन गौडा

बेंगळुरू (कर्नाटक) – देवस्थानचे पावित्र्य राखण्यासाठी देवस्थानाच्या परिसरात कोणत्याही कारणांनी हिंदूंखेरीज इतरांना, तसेच नास्तिकांना दुकाने लावण्यास अनुमती नाकारून ‘कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय अधिनियम १९९७’ची काटेकोरपणे कार्यवाही व्हावी, असे निवेदन ‘कर्नाटक देवस्थान-मठ आणि धार्मिक संस्था महासंघा’च्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. या वेळी महासंघाचे राज्य संयोजक श्री. मोहन गौडा, अधिवक्ता प्रसन्न डी. पी., श्री. राधवेंद्राचार, श्री. श्यामसुंदर, अर्चक श्री. एम्. भागवत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश्वर बी.एम्. आणि इतर उपस्थित होते.

श्री. मोहन गौडा म्हणाले की,

१. मार्च आणि एप्रिल या मासांमध्ये सर्व देवस्थानांच्या धार्मिक जत्रांना प्रारंभ होतो. या वार्षिक जत्रांना लाखो भक्त उपस्थित रहातात. अशा वेळी कोट्यवधी रुपयांचा व्यापार होतो. याचा दुरुपयोग करून अन्य धर्मीय, तसेच देवावर श्रद्धा नसलेले नास्तिक देवस्थानाच्या प्रांगणात आणि परिसरात देवस्थानाच्या पावित्र्याला धक्का लावून व्यापार करत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे देवस्थानाचे सात्त्विक वातावरण नष्ट होते.

२. ‘कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय अधिनियम १९९७’ या कायद्याच्या कलम २९ (८), (१२) प्रमाणे ‘हिंदु देवस्थानाच्या जवळची भूमी आणि इमारत यांसह कोणतीही जागा हिंदूंखेरीज इतरांना देऊ नये’, असा स्पष्ट उल्लेख आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *