बाबरी पाडल्याचा सूड उगवला जाईल ! : इस्लामिक स्टेटच्या नियतकालिकातून धमकी

  • भारतातील एकही मुसलमान संघटना, नेता किंवा समाजिक कार्यकर्ता याविषयी बोलत नाही कि यास विरोध करत नाही ! याचाच अर्थ ‘इस्लामिक स्टेटने असे करावे’, अशीच त्यांचीही अपेक्षा आहे, असे हिंदूंना वाटल्यास चुकीचे ते काय ?
  • धर्मांधांकडून सातत्याने बाबरीचा सूड उगवण्याची भाषा केली जात असल्यामुळे श्रीरामजन्मभूमीवर उभारण्यात येणार्‍या श्रीराममंदिराच्या सुरक्षेसाठी हिंदूंनी आतापासूनच सतर्क रहाणे आवश्यक आहे !

नवी देहली : इस्लामिक स्टेटच्या ‘व्हॉईस ऑफ इंडिया’ या नियतकालिकामध्ये भारतीय मुसलमानांना सरकारच्या विरोधात जिहाद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ‘बाबरीचा सूड उगवण्यात येईल’, अशी धमकीही दिली आहे. हे नियतकालिक गोपनीय पद्धतीने ऑनलाईन प्रसारित केले जाते. सध्याची याची ९ वी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

‘व्हॉईस ऑफ इंडिया’ चे मुखपृष्ठ

या नियतकालिकात बाबरी ढाचा पाडण्याची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली असून ‘बाबरी पाडल्याचा सूड उगवला जाईल. यासाठी इस्लामिक स्टेटचे कार्यकर्ते लढाई लढतील’, असे म्हटले आहे. तसेच ‘नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात उभे रहाणार्‍या मुसलमानांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. भारतीय मुसलमानांनी जिहाद केला पाहिजे. तुम्ही न्यायालयाचा निर्णय स्वीकारला. तुम्हाला भारतीय सरकारच्या विरोधात शस्त्र हातात घ्यायला हवे होते’, असेही म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

इसिसधर्मांध

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​