
सांगली : सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा होण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बोरीगीड्डे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. प्रदीप वरेकर, श्री. निकम आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. याच समवेत पलूस (जिल्हा सांगली) येथेही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.


