Menu Close

चोपडा येथील तहसीलदार आणि भुसावळ येथील प्रांताधिकारी यांना विविध विषयांवरील निवेदन !

चोपडा येथील तहसीलदार राजेंद्र पऊल यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ !

जळगाव : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास काळे फासणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्तींना शासनाने प्रोत्साहन देणे थांबवावे, आंध्रप्रदेश सरकारने ख्रिस्ती पास्टर, मुस्लिम इमाम आणि मौलाना यांना मासिक वेतन देण्याचा निर्णय रहित करावा, चर्चमध्ये होणारे घोटाळे आणि लैंगिक अत्याचार पहाता सर्व चर्चचे सरकारीकरण करावे, जय श्रीरामच्या घोषणा देण्यास भाग पाडले, असा खोटा कांगावा करून अपप्रकार करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशा विविध विषयांवर हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने चोपडा येथील नायब तहसीलदार श्री. राजेंद्र पऊल यांना आणि भुसावळ येथील प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

भुसावळ येथे निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच गोप्रेमी पवन बाक्से, रोहित महाले, धर्मप्रेमी सचिन बडगे आदी उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *