दगडफेक, बॉम्बने उडवण्याची धमकी आणि मार्ग बदलण्यासाठी दबाव; उत्सवात अडथळे

श्री गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान दक्षिण भारतातील विविध भागांत गणेश विसर्जन मिरवणुकांवरून तणावाच्या अनेक घटना समोर आल्या. दगडफेक, बॉम्बने उडवण्याची धमकी, पारंपरिक मार्ग अडवणे आणि प्रशासकीय दबाव आदी आरोपांमुळे भाविकांना विसर्जन मिरवणूक काढण्यात अडथळ्यांचा सामना करावा लागला.
भटकळ (कर्नाटक) : मशिदी आणि मदरशाकडून गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक केल्याचा आरोप
१६ सप्टेंबरच्या रात्री तलांडा सार्वजनिक गणेशोत्सव समितीने आयोजित केलेली श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक रेल्वे स्टेशन रोडवरील गुल्ले रेल्वे ट्रॅकजवळून जात असतांना अचानक दगडफेक झाल्याची घटना समोर आली. इस्माईल सुन्नी जामिया मशीद आणि ताजुसुन्ना अरबी मदरशाच्या दिशेने मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आहे.
Bhatkal, Karnataka: Stone-pelting on Ganesh Visarjan procession passing mosque, retaliatory pelting too! Under Congress’s “Pakistani regime” in Karnataka, attacks on Hindu processions from mosques have become routine. When will Hindus be safe? #Bhatkal #GaneshVisarjan https://t.co/FC2yXQ3iH0
— Pandurang Dhond (@PandurangDhond7) September 19, 2026
यानंतर भाविकांकडूनही प्रतिकार झाल्याचे सांगण्यात आले असून, मशीद आणि मदरशाच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील लोक भटकळ टाउन पोलीस ठाण्याबाहेर जमले. या प्रकरणी दोन्ही पक्षांकडून तक्रारी नोंदवण्यात आल्या.
श्रीविल्लिपुथूर (तमिळनाडू) : मशिदीसमोर गणेश विसर्जन मिरवणूक बॉम्बने उडवण्याची धमकी
विरुधुनगर जिल्ह्यातील श्रीविल्लिपुथूर येथे गणेश विसर्जन मिरवणूक मशिदीजवळून जात असतांना वादाची स्थिती निर्माण झाली. मिरवणुकीदरम्यान काही व्यक्तींनी कथितरित्या आक्षेपार्ह धार्मिक घोषणा दिल्याचे सांगण्यात आले. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाविकांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.
यानंतर दोन तरुणांनी पोलीस अधिकार्यांच्या हस्तक्षेपाला विरोध करून मिरवणूक बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. प्रसारित झालेल्या व्हिडिओच्या संदर्भात भारत हिंदू मुनानीचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष श्री. आर. डी. प्रभु यांनी आरोप केला की, ‘भारत माता की जय’ची घोषणा देणार्या एका हिंदू भाविकाला रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.
During a ganesh chadhurthi procession in tamilnadu Hindus shouted Bharath mata ki jai.. This triggered the Muslims near a mosque and they say they will not tolerate this and bombs will explode in Tamilnadu..they are arguing with the police and threatening them that they are capable of doing anything in this country ..the consequences will be worse.. Don’t expect them to join Hindus in support of Bharath..
— karupaiah Thevar (@karupaiahthevar) September 20, 2026
आरोपी तरुणांना कह्यात घेऊन काही तासांतच सोडून देण्यात आल्याच्या प्रकरणावरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले. काही राष्ट्रवादी संघटनांनी या प्रकरणाची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (NIA) चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हूविना हडगली (कर्नाटक) : पारंपरिक गणेश विसर्जन मार्ग बदलण्यावरून वाद
विजयनगर जिल्ह्यातील हूविना हडगलीच्या इस्लाम पेट परिसरात १८ सप्टेंबरच्या रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीवरून वाद निर्माण झाला. कोरवार ओणीजवळ काही स्थानिकांनी मिरवणुकीचा मार्ग अडवून मिरवणूक इस्लाम पेटमधून न नेता मागील वर्षी वापरण्यात आलेल्या पर्यायी मार्गाने नेण्याची मागणी केल्याचा आरोप आहे.
In Hoovina Hadagali, Vijayanagara, Karnataka the Ganeshotsava procession route was changed following protests by the Muslim community against passing through Islampur. Why should a Hindu procession change its route? 🇮🇳 https://t.co/28luK93gPg
— 🚩Mohan Gowda🇮🇳 (@Mohan_HJS) September 19, 2026
हिंदू तरुणांनी सांगितले की, हा मार्ग अनेक वर्षांपासून गणेश विसर्जन मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग आहे. तथापि, स्थानिक आमदार आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर शांतता राखण्यासाठी मिरवणूक पर्यायी मार्गाने नेण्यावर सहमती झाली.
म्हैसूर (कर्नाटक) : मशिदींजवळून मिरवणूक नेण्यावरून पोलीस अधिकार्याची सूचना
तिरुमकुडलु नरसिपुरा येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीदरम्यान पोलीस निरीक्षक धनंजय यांनी गणेशभक्तांना मिरवणुकीच्या मार्गासंदर्भात आणि आचरणासंदर्भात सूचना दिल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला.
या व्हिडिओमध्ये संबंधित अधिकारी भाविकांना निर्धारित मार्गाचेच पालन करण्याची तसेच मशिदींसमोर थांबणे, फटाके फोडणे किंवा नृत्य करणे टाळण्याची सूचना करतांना दिसत आहेत. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मशिदीसमोर उभे राहून नृत्य करण्याची आवश्यकता काय, असा प्रश्नही अधिकार्यांनी उपस्थित केला.
Police Inspector issued a stern warning that the Ganeshotsava procession should not pass in front of a mosque. Netizens asked: “Can an Eid Milad procession then pass in front of a temple?” Police must answer this question clearly: Will the same rule apply to every procession? https://t.co/fa21qGdtQ1
— 🚩Mohan Gowda🇮🇳 (@Mohan_HJS) September 8, 2026
या वक्तव्यांवरून सार्वजनिक स्तरावर टीका झाली आणि धार्मिक कार्यक्रमांच्या संदर्भात प्रशासनाकडून अवलंबण्यात येणार्या निकषांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
सवानूर, हावेरी (कर्नाटक) : मशिदीचे कारण देत गणेश विसर्जन मिरवणूक रोखली; मूर्ती मंदिरात पुन्हा स्थापित
हावेरी जिल्ह्यातील सवानूर शहरातील सिंपिगेरी (सिंपिगे गल्ली) परिसरात पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणूक रोखल्याची घटना समोर आली. मिरवणूक मंदिरापासून सुमारे ५०० मीटर पुढे गेली असतांनाच, मुख्य मार्गावर (राजा बीधी) मशीद असल्याचे कारण देत पोलिसांनी पुढे जाण्यास अनुमती दिली नाही.
Police Inspector issued a stern warning that the Ganeshotsava procession should not pass in front of a mosque. Netizens asked: “Can an Eid Milad procession then pass in front of a temple?” Police must answer this question clearly: Will the same rule apply to every procession? https://t.co/fa21qGdtQ1
— 🚩Mohan Gowda🇮🇳 (@Mohan_HJS) September 8, 2026
या कारवाईमुळे संतप्त झालेल्या गणेशोत्सव समितीच्या सदस्यांनी पोलिसांची विनंती मान्य केली नाही. त्यांनी मिरवणूक थांबवून श्री गणेशाची मूर्ती पुन्हा मंदिरात नेऊन तिची पुनर्स्थापना केली.
हावेरीच्या पोलीस अधीक्षक यशोदा वंतगोडी आणि समितीच्या पदाधिकार्यांमध्ये झालेली चर्चाही कोणत्याही तोडग्याविना संपली. समितीच्या सदस्यांचे म्हणणे होते की, मागील ३० वर्षांहून अधिक काळापासून याच मार्गावरून गणेशोत्सवाची मिरवणूक शांततेत निघत आली आहे आणि यापूर्वी कधीही अनुचित घटना घडलेली नाही.
समितीचे अध्यक्ष श्री. महेश यांनी पोलीस कारवाईला अनुचित ठरवत व्यापक बैठक घेऊन भविष्यात मिरवणूक मुख्य मार्गावरूनच काढण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे सांगितले.
मदन्नापेट, हैदराबाद (तेलंगाणा) : गणेश विसर्जन कार्यक्रमात मांसाचे तुकडे फेकल्याचा आरोप
हैदराबादमधील मदन्नापेट परिसरात रविवारी गणेश विसर्जन कार्यक्रमादरम्यान कथितरित्या मांसाचे तुकडे फेकण्यात आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली.
Hyderabad: Packet of bones and non-veg waste like beef thrown near Ganesh Annadanam (bhandara) in Madannapet. Three detained — Mohammad Imran Qureshi, Arshiya Begum, Sameena after hindus protested. Police say it was thrown from a housing society around 3 pm. Probe on https://t.co/6wAj4dxbSf
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) September 20, 2026
पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश विसर्जनात सहभागी झालेल्या भाविकांसाठी आयोजकांनी विसर्जनानंतर अन्नदानाची व्यवस्था केली होती. भाविक भोजनासाठी रांगेत उभे असतांना अज्ञात व्यक्तींनी कथितरित्या मांसाचे तुकडे फेकले.
या घटनेच्या निषेधार्थ लोकांनी आंदोलन करून कारवाईची मागणी केली. पोलिसांनी मोहम्मद इमरान कुरेशी, अर्शिया बेगम आणि समीना या तीन संशयितांना कह्यात घेतले.
संपादकीय भूमिका
देशातील एकही सरकार हिंदूंचे रक्षण करण्यात पूर्णपणे यशस्वी ठरलेले नाही. अशा परिस्थितीत धर्मांधांकडून आपल्या आराध्य देवतेचे रक्षण करण्यासाठी हिंदूंची काय तयारी आहे?







