Menu Close

ठाणे : सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर जनजागृतीपर देखावे करणारे ‘हिंदु जागृती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ’!

  • ‘लव्ह जिहाद’ ते ‘डिजिटल जिहाद’च्या सर्व प्रकारांविषयी देखाव्यातून प्रबोधन !

  • ‘अखंड सावधान…वादळ आपल्या उंबरठ्यावर’ या संकल्पनेतून नागरिकांना संदेश !

ठाणे – ‘अखंड सावधान…वादळ आपल्या उंबरठ्यावर’ असा संदेश देत ठाणे येथील घंटाळी मंदिर परिसरातील ‘हिंदु जागृती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळा’ने यंदाच्या देखाव्यातून समाजासमोरील पालटत्या आव्हानांकडे लक्ष वेधले आहे. मागील ३५ वर्षांपासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर जनजागृती करणार्‍या या मंडळाने यंदा ‘लव्ह जिहाद’पासून ‘डिजिटल जिहाद’पर्यंतचे विविध प्रकार, तसेच सामाजिक माध्यमे, आधुनिक तंत्रज्ञान, फसवणूक आणि दिशाभूल करणारी माहिती यांचा समाजावर होणारा परिणाम देखाव्यातून मांडला आहे. ‘वेळेवर सावध व्हा, अन्यथा परिणाम गंभीर असतील’, असा संदेश देत नागरिकांना सजग रहाण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले आहे.

‘वादळ आपल्या उंबरठ्यावर आहे; त्यामुळे डोळे उघडे ठेवून जागृत रहा’, हा यंदाच्या देखाव्याचा मुख्य संदेश आहे, अशी माहिती मंडळाचे कार्यवाह श्री. केदार सुनील आपटे यांनी दिली. मंडळाने श्री गणेशाची स्थापना झाल्यापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

देखाव्याची वैशिष्ट्ये

१. देखाव्यात ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु तरुणींना कशा प्रकारे फसवले जाते ? ‘लँड जिहाद’च्या माध्यमातून भूमी कशा बळकावल्या जातात ?, हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून नामांकित आस्थापनांची उत्पादने कशी हलाल प्रमाणित होत आहेत, कॉर्पोरेट जिहाद, डिजिटल जिहाद, धार्मिक जिहाद यांसारख्या विविध विषयांचा समावेश देखाव्यात करण्यात आला आहे.

२. सामाजिक माध्यमे, आधुनिक तंत्रज्ञान, फसवणूक आणि दिशाभूल करणारी माहिती यांमुळे समाजावर होणार्‍या परिणामांचे चित्रण करण्यात आले आहे. प्रकाशयोजना आणि चित्रफितीच्या माध्यमातून वरील विषयांचे गांभीर्य अधोरेखित करण्यात आले आहे.

३. सामाजिक माध्यमांवरील रिल्स (काही सेकंदांचे व्हिडिओ), पोस्ट किंवा संदेश यांवर लगेच विश्‍वास न ठेवता सत्यता पडताळावी आणि भावनिक प्रतिक्रिया न देता दायित्वाचे भान जपावे, असा संदेश मंडळाने तरुणांना दिला आहे. सामाजिक माध्यमांचा वापर विवेकाने करण्याची आवश्यकता असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे.

४. ‘अभ्यास, आचरण, संघटन आणि ठोस कृती या चतुःसूत्रीच्या माध्यमातून जागरूक नागरिकत्व, सामाजिक एकता, तसेच संस्कृती आणि परंपरा यांचे जतन यांचे महत्त्व सांगण्यात आले आहे. ‘समाजातील घडामोडी समजून घेतांना प्रत्येकाने जागरूक आणि उत्तरदायी नागरिक म्हणून भूमिका पार पाडावी’, असे आवाहन करण्यात आले आहे.

देशासमोरील मोठे संकट असणार्‍या ‘जिहाद’विषयी सांगून नागरिकांना सतर्क करणार्‍या आणि राष्ट्रकर्तव्य बजावणार्‍या ‘हिंदु जागृती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळा’चे अभिनंदन ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती 

किती गणेशोत्सव मंडळे अशा प्रकारे हिंदूंचे प्रबोधन करतात ? राष्ट्र-धर्म संकटात असतांना मनोरंजनपर देखावे साकारण्यापेक्षा राष्ट्रहितकारी देखावे आयोजित केले पाहिजेत ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती 

Latest News