Menu Close

मुलुंड येथे मूर्तीदानानंतर कचराभूमीवर किळसवाण्या स्थितीत आढळल्या श्री गणेशमूर्ती !

हिंदू संकटात असल्याविषयी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडून संताप व्यक्त

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव

(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक, हिंदू जनजागृती समिती )

मुलुंड – येथील विसर्जनानंतर काही गणेशमूर्ती कचराभूमी परिसरात भग्नावस्थेत आणि अत्यंत किळसवाण्या स्थितीत पडून असल्याचे आढळून आले. अनेक मूर्तींचे अवशेष अस्ताव्यस्त पडलेले होते. यावर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी घटनास्थळी जाऊन मूर्तींची पहाणी केली.

या वेळी ते म्हणाले,

‘‘हिंदुत्वाच्या नावावर सत्ता उपभोगणारे आणि महापालिकेत कारभार करणारे लोक केवळ कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढण्यात मग्न आहेत. ज्या गणरायाला आपण दैवत मानतो, त्याची अशी अवस्था होत असेल, तर हिंदू खरोखरच संकटात आहेत का ? श्री गणेशमूर्तींचे दान करू नका; कारण दान केलेल्या मूर्तींची हीच दुर्दशा केली जाते. ढोल-ताशा आणि डीजेसाठी आवाज उठवणारे लोक या विटंबनेविषयी गप्प का ? या विरुद्ध आवाज उठवणार नसाल, तर तुम्ही षंढ आहात.’’

प्रतिवर्षी पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली ‘कृत्रिम तलावात विसर्जन करा’ आणि ‘श्री गणेशमूर्ती दान करा’, असे धर्मशास्त्रविरोधी आवाहन केले जाते. मुलुंड येथील घटना पहाता अशा आवाहनांना ‘धर्मद्रोही’ घोषित करून हिंदूंनी त्या विरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे आणि प्राणपणाने नि वैध मार्गाने निषेध नोंदवला पाहिजे ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती

हिंदूंनो, ‘कृत्रिम तलाव आणि मूर्तीदान हे तुमच्या धर्माचरणावर घाला घालणारे षड्यंत्र आहे’, हे लक्षात घ्या अन् वहात्या पाण्यातच मूर्तीविसर्जन करून तुमचे धर्मकर्तव्य बजावा ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती

Read more on Ganeshotsav

Latest News