
मुंबई – गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ‘कार्स२४’कडून श्री गणेशाला वाहनाच्या विज्ञापन मोहिमेत दाखवण्यात आल्याने हिंदु जनजागृती समितीने आक्षेप घेतला आहे.
The use of Lord Ganesha as a marketing gimmick by @cars24india has deeply hurt Hindu sentiments. Commercialising a revered deity for advertising is unacceptable. @cars24india must take down this campaign immediately and issue an unconditional apology. Apologize or prepare to face a massive public boycott!
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) September 20, 2026
(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
वापरलेल्या गाड्यांची खरेदी-विक्री करणार्या ‘कार्स२४’ या आस्थापनाने विज्ञापनासाठी थेट श्री गणेशालाच वाहनचालकाच्या जागी दाखवले. हा संतापजनक प्रकार ‘खेतवाडी खंबाटा लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’त पहायला मिळाला. या मंडळातील श्रींच्या मंडपात आस्थापनाने विज्ञापनासाठी प्रतीकात्मक मोटारगाडी उभी केली असून स्टेअरिंग हातात धरलेली श्री गणेशाची मूर्ती ठेवली आहे. मूर्तीच्या शेजारील बसण्याची जागा रिक्त असून आस्थापनाच्या कर्मचार्यांकडून दर्शनासाठी येणार्या भाविकांना तेथे बसून छायाचित्रे काढण्याचे आवाहन केले जात आहे. भाविक तेथे स्वतः बसून किंवा लहान मुलांना बसवून छायाचित्र काढून घेत आहेत.
वाहनाच्या मागे आस्थापनाने ‘बाप्पा सोबतीला प्रत्येक वाट सुखाची’ असे बोधवाक्य छापले असले, तरी प्रत्यक्षात मात्र आस्थापनाने प्रतीकात्मक मोटारगाडीत प्रत्यक्ष श्री गणेशालाच वाहनचालक म्हणून बसवले आहे. या प्रतीकात्मक गाडीच्या बोनेटवर ‘बाप्पाच्या सोबत आनंदाचा प्रवास’ असे लिहिलेले दिसते. मंडपात शिरल्यावर ज्या ठिकाणी मुख्य गणेशमूर्तीकडे जाण्याचे प्रवेशद्वार आहे, तेथे ही मोटारगाडी उभी करण्यात आली आहे.







