-
थडग्याची प्रतिकृती नाचवणार्यांवर कारवाई न झाल्यास हिंदुत्वनिष्ठांची आंदोलनाची चेतावणी !
-
जाहीर क्षमा मागण्याची मागणी !

तळोदा (जिल्हा नंदुरबार) – येथील नेमसुशील विद्यालयाने श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत थडग्याची प्रतिकृती नाचवली. या वेळी हिरव्या रंगाचे मुसलमानी कपडे संबंधित मुलांकडून घालण्यात आले होते. या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि भाविक संतप्त झाले असून सकल हिंदु समाज आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी याचा निषेध केला आणि तळोदा येथील तहसीलदारांना २३ सप्टेंबर या दिवशी विविध मागण्यांचे निवेदन दिले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची चेतावणीही हिंदुत्वनिष्ठांनी दिली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,…
१. हिंदु धर्मशस्त्रानुसार कोणत्याही शुभकार्यात, देवतेच्या पूजनात अथवा मंगल सोहळ्यात कबर, थडगे (दफनभूमीतील मृतदेहाची जागा किंवा रचना) किंवा मृत्यूशी निगडित प्रतिकांचे दर्शन घडवणे अत्यंत तामसिक, अशुभ आणि निषिद्ध मानले जाते. मिरवणुकीत थडग्याची प्रतिकृती उभी करून त्यासमोर प्रार्थना करण्याचा प्रसंग दाखवला होता, तसेच अल्लाला उद्देशून असलेल्या गाण्यावर थेट गणेशमूर्तीसमोर नृत्य करण्यात आले.
२. अशा प्रकारची थडगी अथवा कबरी गणेशोत्सवात दाखवून नवीन पिढीला कोणत्या अंधाराकडे ढकलण्याचा हा प्रयत्न आहे ?
३. मृत शरिराशी संबंधित असणार्या थडग्याची विटंबानाकारक सावली मंगलमूर्तीच्या समोर आणून नेमके काय साध्य करायचे होते ? शिवराज्याभिषेकासारख्या ऐतिहासिक आणि पवित्र घटनेशी अशा काल्पनिक प्रसंगांची सांगड घालून इतिहास अन् परंपरा यांचा विपर्यास केला जात आहे. तत्कालीन ऐतिहासिक संदर्भ किंवा बखरी यांच्यात अशा कोणत्याही विधीची नोंद नसतांना गणेशोत्सवात हा देखावा का साजरा केला ?
शाळा व्यवस्थापनाने चौकात फलक लावून क्षमा मागावी ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी
‘सणााच्या मूळ आध्यात्मिक आणि धार्मिक गाभ्याशी छेडछाड करण्याचा अधिकार कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला नाही. हिंदु समाज सहिष्णु असला, तरी स्वतःच्या आराध्य देवतेच्या मिरवणुकीत मृत्यू आणि थडगे यांचे विकृत प्रदर्शन पहाण्याइतका लाचार झालेला नाही. या प्रकरणी शाळा प्रशासनाने तात्काळ जाहीर स्पष्टीकरण द्यावे, तसेच धार्मिक भावना दुखावल्याविषयी तळोदा शहरातील भर चौकात फलक लावून शाळा व्यवस्थापनाने सार्वजनिक क्षमा मागावी, भविष्यात धार्मिक उत्सवांच्या मिरवणुकीत अशा प्रकारची आक्षेपार्ह सादरीकरणे होणार नाहीत, याविषयी प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी, विहित मुदतीत क्षमा न मागितल्यास शाळा व्यवस्थापनाविरोधात सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी चेतावणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दिली आहे, या मागण्या तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
ज्ञानमंदिर असलेल्या शाळेच्या ठिकाणी असे प्रकार होणे दुर्दैवी ! ‘हिंदूंना धर्मशिक्षण नाही’, असे जरी म्हटले, तरी थेट मुसलमानांचा वेश घालून थडगी नाचवण्याइतपत ज्ञान छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील हिंदूंना नाही, असे कसे म्हणता येईल ? – संपादक, हिंदू जनजागृती समिती
धर्मरक्षणासाठी सडेतोड भूमिका घेणार्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती







