Menu Close

कंदुपाडी (कर्नाटक) येथे रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकावर प्राणघातक आक्रमण

काँग्रेसच्या राज्यात हिंदुत्वनिष्ठांवर होणारी आक्रमणे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचेच दर्शवतात !

मंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटकातील संजीपमुन्नुरू गावातील कंदूपाडी येथे रहाणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक श्री. शरत (वय २८ वर्षे) यांच्यावर अज्ञातांनी तलवारीने प्राणघातक आक्रमण केल्याची घटना घडली आहे. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गंभीर घायाळ झालेल्या शरत यांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असल्याने त्यांच्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आक्रमणानंतर येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. खासदार नलिन कुमार कटीलु आणि भाजप, बजरंग दल यांच्या स्थानिक प्रमुखांनी रुग्णालयात जाऊन श्री. शरत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या घटनेनंतर संकेतस्थळावरून दक्षिण कन्नड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. येथे अफवा पसरू नये; म्हणून पोलिसांनी संकेतस्थळांवर लक्ष ठेवले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *