Menu Close

भुसावळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीरामनवमीनिमित्ताने भव्य शोभायात्रा


भुसावळ :
शहरातील अष्टभूजा मंदिरापासून धर्मध्वजाच्या पूजनाने श्रीरामनवमीच्या शोभायात्रेला आरंभ झाला. धर्मध्वजाचे पूजन शिवसेनेचे श्री. उमाकांत शर्मा आणि शिवप्रतिष्ठानचे श्री. रीतेश जैन यांनी केले. या शोभायात्रेत सुवचनांचे फलक आणि भगवे झेंडे, धर्माभिमानी युवकांनी धरले होते. या वेळी ‘राम राम जय श्रीराम, राम लल्ला हम आयेंगे मंदीर वही बनायेंगे’, ‘श्रीराम जय राम जय जय राम’ अशा घोषणांनी भुसावळ शहर दणाणून गेले होते. शोभायात्रेतील धर्मध्वजाचे पूजन आठवडा बाजारात आहुजा प्लायवूडच्या वतीने पूजन करण्यात आले, लक्ष्मीचौकात हिंदु धर्माभिमानी श्री. विनोद शर्मा यांनी केले.

या शोभायात्रेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. दिनेश जोधानी, कट्टर हिंदू गू्रपचे श्री. मनोज चौधरी, योग वेदांत समितीचे श्री. हितेश टकले, शिवसेनेचे श्री. उमाकांत शर्मा, शिवप्रतिष्ठानचे श्री. रीतेश जैन, हिंदु जनजागृती समितीचे श्री. उमेश जोशी, श्री. भूषण महाजन, श्री. पियुष महाजन, तसेच ४० हून अधिक हिंदु धर्माभिमानी या फेरीत सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *