Menu Close

सोलापूर येथे हिंदु जनजागृती समिती आणि लोधी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान

सोलापूर : हिंदु धर्मियांना आमिष दाखवून ख्रिस्ती पंथात घेतले जात आहे, हे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांनी केले. ११ जानेवारीला येथील श्री शितलामाता मंदिरात लोधी समाज अध्यक्ष  श्री. भगतसिंग जगतसिंग कल्लावले आणि लोधी समाजातील कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन हिंदु धर्म प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्या वेळी श्री. बुणगे बोलत होते. या वेळी ४० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

क्षणचित्र

या वेळी धर्मशिक्षणाचे महत्त्व लक्षात आल्याने लोधी समाजाच्या वतीने मासातून एकदा धर्मशिक्षणवर्गाचे नियोजन केले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *