Menu Close

सनबर्न फेस्टिव्हलला महाराष्ट्रात बंदी घालण्यासाठी स्वराज्य निर्माण सेनेकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

jalgaon_nivedan
जिल्हाधिकार्‍यांना (उजवीकडे) निवेदन देतांना स्वराज्य निर्माण सेनेचे कार्यकर्तेे

जळगाव – स्वराज्य निर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. महेश सपकाळे आणि अन्य कार्यकर्ते यांनी सनबर्नला महाराष्ट्रात बंदी घालण्यासाठी जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. हा कार्यक्रम जर महाराष्ट्राचे पावित्र्य नष्ट असेल, तर देव, देश आणि धर्मरक्षणार्थ स्थापन झालेल्या स्वराज्य निर्माण सेनेच्या वतीने या कार्यक्रमावर बंदी आणावी, अशी मागणी करतो, असे नमूद करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *