Menu Close

नालासोपारा आणि जोगेश्‍वरी येथील बैठकांमध्ये धर्माभिमान्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद !

एक भारत अभियान- काश्मिर की ओर

kashmiri_hindu_punarvasan
जोगेश्‍वरी येथील इच्छापूर्ती गणेश मंदिरातील बैठकीत सहभागी झालेले धर्माभिमानी

मुंबई : विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन व्हावे, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने एक भारत अभियान-काश्मिर की ओर ही राष्ट्रव्यापी चळवळ राबवण्यात येत आहे. या चळवळीला देशवासियांचा पाठिंबा मिळावा आणि काश्मिरी हिंदूंचा आवाज बळकट व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी बैठका घेऊन देशप्रेमी नागरिकांपर्यंत हा विषय पोहोचवण्यात येत आहे. यासाठी २ ऑक्टोबर या दिवशी जोगेश्‍वरी आणि नालासोपारा येथे बैठका घेण्यात झाल्या. या बैठकींना धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

जोगेश्‍वरी (पूर्व) श्यामनगर येथील इच्छापूर्ती गणेश मंदिर आणि नालासोपारा (पश्‍चिम) ओम प्लाझा येथील पटेल क्लासेस येथे बैठका पार पडल्या. या दोन्ही बैठकींना बहुसंख्य राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकांची उपस्थिती लाभली. या अभियानाच्या अंतर्गत काश्मीर येथे होणार्‍या सभेला जाण्यासाठी ९ धर्माभिमान्यांनी नावे दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *