Menu Close

पाकमध्ये मानवी बॉम्ब बनून घुसण्याची शिवसैनिकांची सिद्धता !

देशप्रेमापोटी जीवाची पर्वा न करणारे शिवसैनिक ! –  संपादक, दैनिक सनातन प्रभात

shiv-sena-pardaphash-99078

मुंबई : शिवसेनेच्या गुजतरातच्या सूरत येथील कार्यकर्त्यांनी पाकमध्ये आत्मघातकी अर्थात मानवी बॉम्ब बनून घुसण्याची सिद्धता दर्शवली आहे. तसेच सीमेवर लढत असलेल्या घायाळ सैनिकांसाठी रक्तदानाची आणि अवयवदानाची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. याविषयी सूरतच्या जिल्हाधिकार्‍यांना २८ शिवसैनिकांनी निवेदन दिले आहे, अशी माहिती शिवसेना शहराध्यक्ष अरूण कलाल यांनी दिली. आम्ही मानवी बॉम्ब बनून पाकला नष्ट करून हुतात्मा झालेल्या सैनिकांचा सूड उगवू, असा विश्‍वास अरूण कलाल यांनी व्यक्त केला.

सूरत शहराचे उपाध्यक्ष विलास पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच निवेदन दिल्याचेही पाटील यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *