Menu Close

धारवाड (कर्नाटक) येथे भाजपच्या नेत्याची गळा चिरून हत्या !

हिंदूंनो, इसिसच्या आतंकवाद्यांकडून करण्यात येते, तशी हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शी दिसत असल्याने सतर्क रहा !
काँग्रेसच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! या घटनांविषयी पुरो(अधो)गामी आवाज उठवत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

yogesh_Gouda_karnatak_bjp

बेंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्हा पंचायत सदस्य आणि भाजपचे नेते योगेश गौडा यांची अज्ञातांनी १५ जूनला सकाळी गळा चिरून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश सकाळी व्यायामशाळेत जाण्यासाठी निघाले असता आक्रमणकर्त्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले.

पोलीस या आक्रमणकर्त्यांचा शोध घेत आहेत. त्यासाठी येथील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तसेच प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली जात आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *