परदेशी नव्हेत, तर स्वदेशी खेळ खेळा !

काही वर्षांपूर्वी ‘दूरदर्शन’वर दाखवले जाणारे हुतुतू (कबड्डी), खो-खो यांसारखे भारतीय खेळ मुले आवडीने पहायचे, तसेच खेळायचेही. सध्या दूरचित्रवाहिन्यांवर क्रिकेट, फूटबॉल यांसारखे परदेशी खेळ सातत्याने दाखवले जात असल्याने मुलांना तेच आवडू लागले आहेत. ते खेळायला लागल्यावर त्या खेळांविषयी नकळत अभिमान वाटायला लागतो. त्यामुळे नकळत राष्ट्राभिमान घटायला लागतो. Read more »

शिवाजी महाराजांच्या गडकोटांना प्रत्यक्ष भेट द्या !

राज्याची स्थापना करताना शिवाजी महाराजांनी अनेक गड कोट बांधले. अनेक गड जिंकले आणि दुरवस्था झालेल्या अनेक किल्ल्यांची डागडुजी करून ते सुस्थितीत आणले. या गडांचा हा इतिहास आपणासमोर आजही बोलका करतात. या गडांवरच इतिहास जन्माला आला आणि यांच्या साहाय्याने स्वराज्य स्थापन झाले. हे गड इतिहासाची साक्ष देतात. महाराजांच्या या शौर्याच्या इतिहासाची आठवण ठेवूया. Read more »

हॅरी पॉटर नको, तर देवतांच्या व वीरांच्या कथा असलेली पुस्तके वाचा !

मुलांनो, हॅरी पॉटरची गोष्ट ही वास्तवतेचा आधार नसलेली काल्पनिक गोष्ट आहे. ही काल्पनिक साहसकथा कधीतरी सत्यात उतरेल काय ? केवळ त्याच्या नादी लागून आपल्या संस्कृतीतील अनमोल ठेवा विसरू नका ! Read more »

‘भारतात सुराज्य स्थापन करणे’, हेच खरे ‘करियर’

तुम्ही राष्ट्रपुरुष, संत आणि राम-कृष्ण यांसारख्या देवता यांचा आदर्श ठेवला, धर्माचरण केले, नैतिक मूल्यांची जपणूक करून शिक्षण घेतले आणि त्या शिक्षणाचा उपयोग राष्ट्र अन् धर्म यांच्या सेवेसाठी केला, तर भारतात पुन्हा छत्रपती शिवरायांना अपेक्षित असे ‘हिंदवी स्वराज्य’ (हिंदू राष्ट्र, आदर्श राज्य, रामराज्य) निश्चितच स्थापन होईल. असे ‘सुराज्य स्थापन करणे’, हेच तुमचे खरे ‘करियर’ आहे ! Read more »

पाठ्यपुस्तकांतील राष्ट्रद्रोही आणि खोट्या इतिहासाला विरोध करा !

मुलांना नैतिकतेचे धडे मिळावेत, त्यांचा राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान वाढावा, देशवासियांकडून पूर्वी झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत आदी हेतूंसाठी मुलांना शालेय पाठ्यपुस्तकांतून इतिहास शिकवला जातो. परंतु आजकालच्या पाठ्यपुस्तकांतून हे हेतू काही वेळा डावलले जातात. Read more »

‘धर्म’ हा राष्ट्राचा प्राण असून धर्माचरण करा !

‘धर्म’ हा राष्ट्राचा प्राण आहे. राष्ट्राला धर्माचे अधिष्ठान असेल, राजा अन् प्रजा दोघेही धर्मपालक असतील, तरच ते राष्ट्र सर्व संकटांतून मुक्त अन् सुखी होते. धर्माविषयी प्रेम वाटायला लागले की, धर्माविषयी अभिमान निर्माण होतो. धर्माविषयी अभिमान निर्माण झाला की, धर्मरक्षण करण्याचे बळ आपल्या अंगी येते ! Read more »

देवतांचे विडंबन रोखून धर्मरक्षण करा !

जेथे देवतेचे चित्र (रूप) असते, तेथे ती देवता अदृश्य रूपात असते. काही जणांच्या कपड्यांवर देवतेचे चित्र किंवा ‘ॐ’ सारखे धर्मचिन्ह असते. अशा कपड्यांचा धुतांना चोळामोळा होतो किंवा त्यांवर डाग पडू शकतात. यामुळे देवतेचे विडंबन होते. मात्र अशी कृत्ये होऊ नयेत, यासाठी प्रयत्न केले, तर देवतांचा आशीर्वाद मिळतो अन् धर्मरक्षणही होते. Read more »

राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती होण्यासाठी हे करा !

सार्वजनिक ठिकाणीही देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती वाढवणारी गीते सादर केल्याने तुमचा राष्ट्राभिमान अन् धर्माभिमान वाढेल आणि वृत्ती सात्त्विक होईलच; पण समाजासमोरही नीतीमत्ताहीन नट-नट्यांचा आदर्श रहाण्यापेक्षा संत, राष्ट्रपुरुष अन् क्रांतीकारक यांचा आदर्श राहील. Read more »

विद्यार्थी बांधवांनी भारतमातेच्या रक्षणासाठी सिद्ध व्हावे !

अनाचार आणि राष्ट्र अन् धर्म यांप्रतीची अनास्था यांची सद्यस्थिती विद्यार्थ्यांपुढे मांडून त्यांना अंतर्मुख करण्याची आज खरच आवश्यकता आहे. त्यांना योग्य दिशा मिळायला हवी, त्यासाठी हा लेख प्रस्तुत केला आहे. Read more »

पाश्चात्त्यांच्या विळख्यात अडकलेल्या आजच्या पिढीमुळेच राष्ट्र संकटात आहे…!

आज आपली युवा पिढी मोठ्या हौसेने आणि ऐटीने पाश्चात्त्यांच्या वेशभूषेचे अनुकरण करत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी आपल्याला महान हिंदु संस्कृतीचा प्रसार करणे आवश्यक आहे. खालील लेखातून युवा पिढीची सध्यस्थिती पाहूूया. Read more »