पाश्चात्त्यांच्या विळख्यात अडकलेल्या आजच्या पिढीमुळेच राष्ट्र संकटात आहे…!

१. धमकीची भाषा बोलणारी गुंड प्रवृत्तीची शालेय मुले !

‘तू शाळेबाहेर भेट. तुला दाखवतो. माझे नाव सांगतोस काय ? या मुलाला त्रास द्यायचा नाही. तो आमच्या ग्रुपचा आहे. माझ्या नादाला लागू नको. तुला माहीत नाही माझी पोहोच काय आहे ते…’ अशी मुक्ताफळे विद्यार्थ्यांच्या तोंडून बाहेर पडतांना ऐकली की, कोणत्याही ‘गँगस्टर’ किंवा ‘पुंडाई’ करणार्‍या संघटनेच्या कार्यालयात बसल्यासारखे वाटते. – श्री. गजानन आशिष, सप्टेंबर २००९

२. ‘थ्री डी’त गुंतलेली तरुण पिढी !

‘सध्याचे भारतीय तरुण पाश्चात्त्यांप्रमाणे ‘थ्री डी’मध्ये म्हणजे ड्रग्ज, ड्रिंक आणि डान्स (अमली पदार्थ, मद्य आणि नाच) यांत गुरफटले आहेत !’ – श्री श्री श्री मुक्तानंद स्वामी, करिंजे, जिल्हा दक्षिण कन्नड, कर्नाटक (३०.१.२०१०)

३. वेशभूषेतून पाश्चात्त्यांच्या अधीन झालेली युवा पिढी

कोणताही धर्म, जात आणि सभ्यता यांमध्ये त्यांची वेशभूषा अधिक महत्त्वाची असते. त्यामुळेच त्या लोकांच्या मानसिकतेचा परिचय मिळतो. आज आपली युवा पिढी मोठ्या हौसेने आणि ऐटीने पाश्चात्त्यांच्या वेशभूषेचे अनुकरण करत आहे; परंतु ती धारण करून स्त्रिया आपले शील रक्षण करू शकत नाहीत. टाय, कोट-पँट, जीन्स, मिनी स्कर्ट घालून स्वतःला अद्ययावत समजणारी आणि कुर्ता-पायजमा, धोतर, परकर (लहँगा) ओढणी इत्यादी घालण्याची लाज वाटणारी युवा पिढी उन्नतीच्या नावावर अधोगतीकडेच जात नाही का ? केवळ शोभाचारासाठी (फॅशन) किंवा स्वतःला दुसर्यां पेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी आपण आपल्या सांस्कृतिक परंपरांना तिलांजली द्यायची का ? – हिन्दू-जागृति से संस्कृति रक्षा

४. आई-वडिलांकडून धर्माचरण न झाल्याने
बिघडलेली श्रीमंतांची उद्दाम पोरे !

श्रीमंतांची उद्दाम पोरे क्रोधी, संतापी, उद्धट, उधळी, हिंसक असतात. या लोकांच्या पार्ट्यांत कोणत्याही क्षणी हिंसाचाराचा भडका उडतो. या लोकांच्या पार्ट्यांना जाणे, म्हणजे संकटाच्या सावलीत वावरणे आहे. हिंदुस्तानात मोठ्या शहरात (खेड्यातही) बंदूक संस्कृती उफाळत आहे. कोणत्याही क्षणी क्षुल्लक कारणावरून ठिणगी पडू शकते.

श्रीमंतांची पोरे श्रीमंतीचे बेताल आणि उन्मत्त प्रदर्शन करतात. कशालाही ‘नाही’ म्हटले की, ते अपमान समजतात. ‘पैसा फेकला की, हवी ती गोष्ट विनासायास मिळते, मिळायला हवी’, अशी त्यांची उद्दाम भावना आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान अशा ठिकाणी दिवसाढवळ्या खून पडतात. लोक बेदरकारपणे बंदूक घेऊन फिरतात.

‘फायर हॉल’ या हॉटेलमध्ये गोळीबार झाला. त्यात दिवसाढवळ्या सुरासारी झाली. त्यात ११ माणसांचे खून पडले. दिल्लीत एक लाखापेक्षा अधिक लोक (शस्त्रधारण करण्याचा) परवाना बाळगतात. आणखी काही लाख सहज अवैध असतील ! हे श्रीमंत लोक अत्यंत असंयमी आणि जंगली आहेत.

आई-वडिलांकडून धर्माचरण झाले, तर मुले, कुटुंब, आप्तेष्ट आणि आसमंत यांवर अपेक्षित परिणाम घडेल, घडतो. आई-वडिलांचे छत्र असते; म्हणून मुले अशी जंगली होतात. श्रीमंतांची वाया गेेलेली वाह्यात मुले असतात. या जंगली संस्कृतीत निद्रानाश अटळ आहे. मोठ्या शहरातील क्लबमध्ये खुनाखूनी चालू आहे. मंत्रीमंडळातील काका, मामा, मित्र यांना भरीला घालून ते सहज सुटतात. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जानेवारी २००७)

५. शिस्त आणि शारीरिक सामर्थ्य नसलेला;
पण व्यसनाधीन, दारू आणि वेश्यागमन करणारा आजचा तरुण

शिस्त नावाचा प्रकार तरुण पिढीमध्ये राहिलेला नाही. व्यायाम नावाचा प्रकारही तरुणांमध्ये राहिला नाही. नवीन पिढी आळशी आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत झाली आहे. लष्कराकडे वळणे ही गोष्ट लांबच राहिली; पण लष्करात जाण्यासाठी आवश्यक असे शारीरिक सामर्थ्य आणि क्षमताही तरुणांत राहिली नाही. अनेक तरुण व्यसनाधीन झाले आहेत. विडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा, दारू, यांचबरोबर वेश्यागमनही करत आहेत. एडस्, गुप्तरोग यांनी तरुण-तरुणींना घेरले आहे. अनेक लोकांकडे भ्रष्टाचारामुळे प्रचंड पैसा आला आहे. शेवटी ते आणि त्यांची मुले हा पैसा कोठे खर्च करतात ? हाच विषय महत्त्वाचा आहे. दारू, सिगारेट, मटका, जुगार अशा अनेक प्रकारच्या व्यसनांतच हा पैसा जातो. – श्री. अनिल कांबळे (मासिक ‘लोकजागर’, अमरनाथ यात्रा विशेषांक २००८)

६. फॅशनच्या आहारी गेलेले युवक-युवती !

‘युवकांमध्ये व्यायाम आणि खेळ यांची आवड राहिली नाही. युवतींमध्ये सौंदर्य आणि लोकप्रिय पाशात्त्य पद्धतीचे कपडे व केशरचना यांची (फॅशनची) आवड आली आहे. आजचे मम्मी-डॅडी काय करत आहेत ?’ – लोकजागर

‘देशाची आज दयनीय स्थिती आहे. आज देशाला ‘लिपस्टिक’ लावणार्‍या महिलांची नव्हे, तर जिजामातांसारख्या मातांची आवश्यकता आहे.’ – प्रा. राजेंद्र ठाकूर, उत्तूर, कोल्हापूर (१४.३.२०११)

७. राष्ट्रप्रतीकांचा अनादर करून (कु)आदर्श जोपासणारे तरुण !

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे गड, किल्ले ही आपली राष्ट्रीय तीर्थक्षेत्रे आहेत. आजचे तरुण या तीर्थस्थानांची माती कपाळाला लावण्याऐवजी तेथील भिंतींवर स्वतःचे नाव लिहून त्यांचा अनादर करतात ! भारतातील तरुणांनी स्वतःसमोर हिंदुतेजाचा, क्रांतीकारकांच्या पराक्रमाचा आणि धैर्याचा आदर्श ठेवायला हवा; मात्र त्यांचे आदर्श चित्रपटांतील नट-नट्या आहेत, हे या देशाचे दुर्दैवच होय !’ – डॉ. सच्चिदानंद शेवडे, सुप्रसिद्ध व्याख्याते आणि साहित्यिक, डोंबिवली, ठाणे. (१२.७.२०१०)

८. देश अराजकाच्या उंबरठ्यावर उभा असतांना स्वतःच्या
चौकटीतून बाहेर पडायला सिद्ध नसणारी तरुण पिढी !

‘देश स्वतंत्र करण्यासाठी एका संपूर्ण पिढीने रक्ताचे पाणी केले, तोच देश आज अराजकाच्या उंबरठ्यावर असतांना त्याविषयी पुढील पिढी मात्र कमालीची उदासीन दिसते. ‘मी, माझे कुटुंब, माझी नोकरी, माझा धंदा’ या चौकटीपलीकडे जाऊन काहीतरी करण्यास कोणीही उत्सुक दिसत नाही. ‘या देशाचा नागरिक या नात्याने माझी काही कर्तव्ये आहेत’, याचाच सर्वांना विसर पडला आहे. राज्यकर्ते देश लुटत असतांना चहा पितांना त्यांना शिव्या घालण्यापलीकडे जनता काहीही करत नाही.’ – श्री. अमर जोशी, साधक-पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

९. स्वातंत्र्यासाठी एक पिढी लढते,
दुसरी पिढी भोगते आणि तिसरी पिढी गमावते, हा समाजनियम आहे !

‘भारत स्वतंत्र झाला, तरी ती शाश्वत गोष्ट थोडीच रहाणार आहे ? एक पिढी लढते, दुसरी पिढी भोगते आणि तिसरी पिढी गमावते, हा क्रम खंडित न होता चालू आहे. सगळ्या राजकुलाचा आणि समाजाचा इतिहास या तीन वाक्यात भरला आहे.’ – श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी.