१. श्रीक्षेत्र शहापूर

शहापूरचा चुन्याचा मारुती म्हणजे समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी पहिला मारुती आहे.मूर्तीची उंची सुमारे ६ फूट असून मूर्तीचा चेहरा उग्र वाटणारा आहे. Read more »

२. श्रीक्षेत्र मसूर

समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी मसूरचा ‘महारुद्र हनुमान’ हा एक महत्त्वाचा मारुती आहे. मूर्ती चुन्याची आहे. मूर्ती पूर्वाभिमुख असून मूर्तीची उंची साधारणत: ५ फूट आहे. Read more »

३. चाफळचे दोन मारुती

चाफळ आणि सज्जनगड ही समर्थांच्या जीवनातील दोन महत्त्वाची ठिकाणे. श्रीरामाने दिलेल्या दृष्टांताप्रमाणे अंगापूरच्या डोहातील श्री रामाची मूर्ती समर्थांनी बाहेर काढली Read more »

४. श्रीक्षेत्र शिंगणवाडी

चाफळपासून अर्धा ते एक कि. मी. अंतरावर नैऋत्य दिशेस शिंगणवाडी ही टेकडी आहे. या टेकडीवरील गुहेत समर्थ रामदास स्वामी जप, ध्यान-धारणा करीत असत. Read more »

५. श्रीक्षेत्र उंब्रज

मसूरच्या पश्चिमेस चार किलोमीटर अंतरावर उंब्रज हे ठिकाण आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी वयाने लहान वाटणार्‍या या मारुतीस ‘बालमारुती’ म्हणतात. Read more »

६. श्रीक्षेत्र माजगाव

चाफळहून माजगांव हे सुमारे २ कि. मी. अंतरावर आहे. माजगावच्या मारुतीची उंची ५ फूट असून मूर्ती पश्चिममुखी आहे. चाफळच्या रामाकडे या मूर्तीचे तोंड आहे. Read more »

७. श्रीक्षेत्र बहे – बोरगाव

कृष्णा नदीच्या किनारी बोरगावजवळ बहे हे गाव आहे. त्यामुळे या ठिकाणाला बहे – बोरगाव म्हणतात. बहे-बोरगांवचा मारुती हे एक जागृत देवस्थान आहे. Read more »

८. श्रीक्षेत्र मनपाडळे

समर्थस्थापित अकरा मारुतीपैकी मनपाडळे हा एक. नदीच्या काठी वसलेले हे मारुती मंदिर कौलारू आहे. मंदिराचा गाभारा ७ x ६ चौ. फूट असून याच्याभोवती २६ x १५ चौ. फुटांचा भव्य सभामंडप आहे. Read more »