रात्री लवकर निजून सकाळी लवकर उठावे !

‘धर्मशास्त्रात सांगितले आहे की, प्रत्येकाने सकाळी लवकर म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी उठायला हवे; परंतु आजकाल मुलांना अभ्यास किंवा अन्य कारणास्तव रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याची आणि सकाळी ८-९ वाजता उठण्याची अयोग्य सवय लागली आहे. Read more »

सकाळी लवकर उठून स्नान करावे !

ती स्नान करण्‍याची आदर्श वेळ आहे. सूर्योदयापूर्वी मंगलस्नान केल्‍याने जीव अंतर्-बाह्य शुद्ध होऊन त्‍या काळातील सात्त्विक लहरी ग्रहण करू शकतो. पहाटे उठून डोक्‍याला आणि शरिराला तेल लावून नंतर कोमट पाण्‍याने स्नान करावे. स्नान करतांना हे श्लोक म्हणावे. Read more »

स्नानानंतर हे करा !

दिवसाचा आरंभ (सुरुवात) चांगला झाल्यास पूर्ण दिवसच चांगला जातो; म्हणूनच सकाळच्या वेळी शरीर शुद्धीसाठी आपण प्रतिदिन स्नान करतो. शरिराप्रमाणे मन शुद्ध व्हावे, यासाठी प्रतिदिन पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे. मन शुद्ध राहिल्यास आपला अभ्यासही चांगला होईल. Read more »

तिन्हीसांजेच्या वेळी हे करावे !

तिन्हीसांजा झाल्या की, पशूपक्षी, प्राणी, मानव सर्वच जण आपल्या घरट्याकडे परततात. मुलांनो, तिन्हीसांजेच्या वेळी घरी परतल्यानंतर काय करायचे, हे पुढील लेखात पाहूया ! Read more »

जेवणासंबंधी पुढील सूचनांचे पालन करा !

‘अन्‍न हे ब्रह्मस्‍वरूप आहे’, असे मानून ते ‘देवाचा म्‍हणून आणि नामजप करत ग्रहण केल्‍याने ते एक पवित्र यज्ञकर्मच बनते. भोजनादी आचारकर्माच्‍या आचरणातून ‘भोजन हे यज्ञकर्म बनावे यासाठी पुढील काही सूचनांचे पालन करावे. Read more »

आई-वडील आणि घरातील मोठ्या व्यक्ती यांना वाकून नमस्कार करावा !

भारतीय परंपरेनुसार विविध प्रसंगी घरातील मोठ्यांना पाया पडण्याची पद्धत आहे. एक प्रकारे ही आशीर्वाद घेण्याचीच पद्धत आहे. काही मुलांना आई-वडिलांना वाकून नमस्कार करायची लाज वाटते. पुढील लेखात जाणून घेऊया मोठ्यांना वाकून नमस्कार का करावा ? Read more »

घरी आलेल्या पाहुण्‍यांचे स्‍वागत आणि आदरातिथ्‍य करावे !

संस्कृतमध्ये ‘अतिथी देवो भव ।’ असे म्हटले आहे. याचा अर्थ अतिथी हे देवाचेच रूप आहे. ‘अतिथीच्या रूपाने देवच आपल्याकडे आलेला असतो’, अशी हिंदु धर्माची शिकवण आहे. धर्माच्या शिकवणीनुसार पाहुण्यांचा आदर आपण केला पाहिजे. त्यांचे स्वागत आणि आदरातिथ्य चांगल्या पद्धतीने केले पाहिजे. Read more »

शाळेला विद्येचे मंदिर मानून आदर्शरित्या वागावे !

विद्यार्थीदशेत आपला बहुतेक वेळ शाळा आणि शिक्षण यांच्याशी निगडित असतो. शाळा हे विद्येचे मंदिर आहे, तसेच ते संस्काराचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. भावी आयुष्‍यात यशस्‍वी होण्‍यासाठी आई-वडील तुम्‍हाला शाळेत पाठवतात. गुणसंपन्‍न बनून हिंदुस्‍थानचे भावी आधारस्‍तंभ व्‍हा. यासाठी पुढील गोष्‍टी लक्षात ठेवा. Read more »

शाळेच्‍या डब्‍यातून घरचे पदार्थ न्‍यावेत !

आजकाल मुलांना शाळेत डबा न्यायला लाज वाटते. त्यापेक्षा विकतचे पदार्थ खाण्याकडे अधिक कल असतो. पुढील लेखात शाळेच्या डब्याविषयी काही सूचना पाहूया ! Read more »