आदर्श व्यक्‍तीमत्त्वाची गुरुकिल्ली असलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवा !

जीवनात सतत आनंदी रहाता येण्‍याकरता आपल्‍यातील स्‍वभावदोष दूर करण्‍यासाठी सातत्‍याने आणि तळमळीने प्रयत्न करणे आवश्‍यक असते. स्‍वभावदोष जाऊन मुलांमधे आंतरिक सुधारणा झाली की, ‘खर्‍या अर्थाने त्‍यांच्‍या व्‍यक्‍तिमत्त्वाचा विकास झाला’, असे म्‍हणता येईल. Read more »

मुलांनो, मनाचे कार्य जाणून घ्या !

आपण जे ‘मन’ म्हणून संबोधतो, ते मन म्हणजे नेमके काय असते ? त्याची रचना आणि कार्य कसे असते ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. हो ना ? या लेखातून आपण मन आणि मनाचे कार्य यांविषयी अधिक माहिती घेऊया. Read more »

स्वभावातील गुण-दोषांचा व्यक्तीमत्त्वावर काय परिणाम होतो ?

मुलाच्या (किंवा मुलीच्या) स्वभावातील गुणांमुळे तो सर्वांना हवाहवासा वाटतो, तर त्याच्या स्वभावातील दोषांमुळे त्याच्यापासून सर्व जण दूर रहाण्याचा प्रयत्न करतात. या लेखात स्वभावातील गुण-दोषांचा स्वतःवर कसा परिणाम होतो, दोषांमुळे किती हानी होते, याविषयी आपण जाणून घेऊया. Read more »

स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया म्हणजे काय ?

न्‍यूनगंड, भीती, काळजी, नैराश्‍य यांसारख्‍या स्‍वभावदोषांमुळे मन दुर्बल होते. स्‍वार्थीपणा, मत्‍सर, चिडचिडेपणा यांसारख्‍या दोषांमुळे सर्व सोयीसुविधा उपलब्‍ध असतांनाही सुखी-समाधानी होता येत नाही. जीवनात सतत आनंदी रहाता येण्‍याकरता आपल्‍यातील स्‍वभावदोष दूर करण्‍यासाठी सातत्‍याने आणि तळमळीने प्रयत्न करणे आवश्‍यक असते. Read more »

स्वतःमधील स्वभावदोषांची सूची (यादी) बनवा !

काही दोष आणि त्यांच्या विरुद्ध असलेले गुण यांची सूची (यादी), तसेच कोणते दोष घालवणे आणि कोणते गुण जोपासणे आवश्यक आहे ते या लेखात दिली आहे. इतरांना अधिक त्रासदायक ठरू शकणारे, स्वत:ला अधिक त्रासदायक ठरू शकणारे असे दोषांची यादी करा. Read more »

स्वतःमधील चुका शोधण्यासाठी हे करा !

आपण दैनंदिन व्यवहार करतांना ‘मला माझ्या चुका शोधायच्याच आहेत’, असा दृढ निश्चय करून सतर्कता बाळगली, तर स्वतःच्यापुष्कळ चुका स्वतःच्या लक्षात येतात. कोणीही सांगितलेल्या चुकीवर समर्थन न करता ती चूक स्वीकारली तर इतरांचे ही साहाय्य लाभते. Read more »

अयोग्य कृतीची जाणीव आणि तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठीची स्वयंसूचना पद्धत

या पद्धतीनुसार दिलेल्या स्वयंसूचनेमुळे चुकीचे विचार, भावना आणि अयोग्य कृती यांची मुलाला / मुलीला जाणीव होते अन् त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे त्याला / तिला शक्य होते. स्वयंसूचना बनवण्यास शिकण्यासाठी काही प्रसंगांचा अभ्यास या लेखात दिला आहे. Read more »

अयोग्य प्रतिक्रियेच्या ठिकाणी योग्य प्रतिक्रिया यासाठीची स्वयंसूचना पद्धत

अनेक प्रसंगांत मुलाकडून / मुलीकडून काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त होते किंवा त्याच्या / तिच्या मनात उमटते. अयोग्य प्रतिक्रिया स्वभावातील दोषांमुळे येतात, तर योग्य प्रतिक्रिया स्वभावातील गुणांमुळे येतात. एक-दोन मिनिटांपेक्षा अल्प वेळ टिकणार्‍या प्रसंगात अयोग्य प्रतिक्रियेच्या ठिकाणी योग्य प्रतिक्रिया यावी, यासाठी ही स्वयंसूचना पद्धत वापरतात. Read more »

कठीण वाटणार्‍या प्रसंगाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठीची स्वयंसूचना पद्धत

‘प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवता येतील का’, अशी काळजी वाटणे; तोंडी परीक्षा, वार्तालाप (मुलाखत), वक्तृत्व स्पर्धा इत्यादी प्रसंगांची भीती वाटणे आदी.दोष दूर करण्यासाठीच्या स्वयंसूचना पध्दती ! Read more »