Menu Close

अहिल्यानगर (महाराष्ट्र) : पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांचा ‘मास्टरमाईंड’ शोधून कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीचे कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथे निवेदन !

पोलीस निरीक्षकांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र) – पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील अनेक युवकांना दिशा देऊन देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कृतीशील केले आहे. त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे अनेक युवक राष्ट्र-धर्म रक्षणासाठी कृतीशील झालेले आहेत, तसेच व्यसनांपासून दूर झालेले आहेत. त्यामुळे पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे अनेक युवकांचे प्रेरणास्थान आहेत. असे असतांना पू. भिडेगुरुजींवर वेगवेगळ्या ठिकाणी काही समाजकंटकांकडून आक्रमणे करण्याचा, त्यांना त्रास देण्याचा, त्यांच्या गाड्या अडवण्याचा प्रकार होत आहे. मनमाड येथे २९ फेब्रुवारी या दिवशी अशाच प्रकारची घटना रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. स्वतःला आंबेडकरवादी म्हणवणार्‍या काही माथेफिरूंनी त्यांच्या गाडीवर आक्रमण केले. या वेळेस आक्रमण करतांना गाडी अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ केली, पायातील बूट आणि अन्य तत्सम वस्तूंचा उपयोग करून गाडीच्या काचा फोडण्याचा गंभीर प्रकार केला. पू. गुरुजींसारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वावर, तसेच वयोवृद्ध व्यक्तीवर अशा प्रकारचे भ्याड आक्रमण हे निषेधार्ह असून पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांचा ‘मास्टरमाईंड’ (सूत्रधार) शोधून कारवाई करावी, या संदर्भातील निवेदन कोपरगाव येथील तहसीलदार सौ. प्रफुल्लिता सातपुते आणि पोलीस निरीक्षक देशमुख यांना देण्यात आले.

यात पुढील मागण्या करण्यात आल्या –

१. दोषींना पकडून त्वरित कठोर कारवाई करावी

२. हा पूर्वनियोजित कट आहे का ? याची चौकशी करावी

३. पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना लवकरात लवकर सुरक्षा पुरवावी

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *