Menu Close

डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांच्या हस्ते पर्जन्यवृष्टी महायज्ञास प्रारंभ

latur_yadnya

लातूर : दुष्काळावर मात करण्यासाठी आर्य प्रतिनिधी सभा, मुंबई आणि पर्जन्यवृष्टी महायज्ञ समितीच्या वतीने आयोजित पर्जन्यवृष्टी महायज्ञात आहुती आणि आशीर्वाद देत काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी यज्ञाचा शुभारंभ केला.

या वेळी २१ सहस्र रुपयांचा निधीरूपी प्रसादही दिला. जगद्गुरूंसह नाथपिठाचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, रुईभर येथील प.पू. दत्तस्वरुप अप्पाबाबा महाराज यांनीही या यज्ञात आहुती टाकत यज्ञाचे आणि पाण्याचे महत्त्व विषद केले.

दुष्काळाचे चटके सहन करणार्‍या लातूरकरांना जीवनदान देण्यासाठी करण्यात येत असलेला पर्जन्यवृष्टी महायज्ञ यशस्वी होईल, असेही जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Read more on Hinduism

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *