Menu Close

मंचर (पुणे) येथील लव्ह जिहाद प्रकरणी हिंदु मुलीचा भयंकर छळ झाल्याचे उघड !

  • पीडित हिंदु मुलीची मानसिक स्थिती गंभीर

  • आरोपीला अटक

मंचर (पुणे) – येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी २६ मे या दिवशी पत्रकार परिषद घेऊन उघड केलेल्या लव्ह जिहादच्या प्रकरणात बळी पडलेल्या मुलीचा प्रचंड लैंगिक आणि शारीरिक छळ झाल्याचे आता उघड झाले आहे. पीडित मुलीची रुग्णालयीन पडताळणी करण्यात आली असून तिने पोलिसांना सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. आरंभी मुलगी घाबरली असल्याने काही बोलण्यास सिद्ध नव्हती; परंतु पोलिसांनी तिला विश्‍वासात घेतल्यावर तिने सर्व गोष्टी सांगितल्या. या प्रकरणातील आरोपी जावेद याला पोलिसांनी अटक करून येरवडा कारागृहात टाकले आहे.

तब्बल ४ वर्षे पीडित हिंदु मुलगी या लव्ह जिहाद्यांच्या कह्यात होती. या कालावधीत या धर्मांध मुलाच्या कुटुंबियांनी तिला बुरखा घालण्यास भाग पाडले, गोमांस खाऊ घातले, नमाज पडण्याची सक्ती केली, तसेच तिला सिगारेटचे चटके दिले. इतकेच नव्हे, तर तिला देहविक्री करण्यास भाग पाडले. त्यामुळे पीडित मुलीची मानसिक स्थिती अत्यंत गंभीर झाली होती. कुठलाही पुरुष समोर आला, तरी तिला भीती वाटत होती. तिच्या वडिलांशीही ती अनेक दिवस ती बोलू शकत नव्हती.

वरील वृत्त वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले.

मुलीचे ४ वर्षांपूर्वी अपहरण करण्यात आले, त्या वेळी ती अल्पवयीन असल्याने आरोपीवर ‘पॉक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आला आहे. २६ मे या दिवशी पत्रकार परिषदेत पडळकर यांनी लव्ह जिहाद न मानणार्‍या राजकारण्यांना उद्देशून ’लव्ह जिहाद माहीत नाही, असे म्हणणारे पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय यांना भेटणार का ?’ असा प्रश्‍न उपस्थित केला होता.

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर घरच्यांना काळजी वाटून त्यांनी परत मुलीचा शोध चालू केला असता, त्यांना ती परत गावात आल्याचे कळले आणि त्यांनी तिच्या सुटकेसाठी प्रयत्न केले.

पोलिसांनी दाद दिली नाही !

‘४ वर्षांपासून मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे अनेकदा दाद मागण्याचा प्रयत्न करूनही पोलिसांनी दाद दिली नाही’, हा विषय २६ मे या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत मुलीच्या भावाने विस्तृतपणे सांगितला होता.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *