Menu Close

कोरेगाव भीमा दंगलीचा मुख्य सूत्रधार मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षलवादी ठार !

महाराष्ट्र पोलिसांची नक्षलवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई !

कोरेगाव भीमा दंगलीचा मुख्य सूत्रधार मिलिंद तेलतुंबडे

छत्तीसगड – महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ कोटगुल-ग्यारापत्ती जंगलाच्या परिसरात १३ नोव्हेंबरच्या रात्री महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत कोरेगाव भीमा दंगलीचा मुख्य सूत्रधार मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षलवादी ठार झाले. मिलिंद तेलतुंबडे याला पकडण्यासाठी शासनाने ५० लाख रुपयांचे पारितोषिक घोषित केले होते. नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाईसाठी खास सिद्ध करण्यात आलेल्या ‘सी-६०’ या महाराष्ट्र पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली.

मिलिंद तेलतुंबडे हा कुख्यात माओवादी नेता होता. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा तो सदस्य होता. महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या धडक कारवाईविषयी समाजातील सर्वच स्तरांवरून पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *