Menu Close

मुर्शिदाबाद (बंगाल) येथे संघ स्वयंसेवकाची पत्नी आणि मुले यांच्यासह हत्या

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

मुर्शिदाबाद (बंगाल) : येथे बंधू प्रकाश पाल, त्यांची गर्भवती पत्नी ब्युटी आणि त्यांचा ८ वर्षांचा मुलगा यांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बंधू प्रकाश पाल हे शाळेत शिक्षक होते. बंधू प्रकाश पाल हे संघाचे स्वयंसेवक होते, असे संघाने म्हटले आहे. पाल कुटुंब ६ वर्षांपूर्वीच येथे रहायला आले होते. अज्ञातांकडून धारदार शस्त्रांद्वारे यांची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ‘मुलाच्या शिक्षणासाठी ते येथे स्थायिक झाले होते. त्यांचे कोणाशी काही भांडण होते का? याविषयी काहीही माहिती नाही’, असे त्यांच्या भावाने सांगितले. ‘बंधू पाल हे संघाच्या बैठकीला नेहमी उपस्थित असायचे’, असे संघाचे बंगालचे सचिव जिशनू बासू यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *