Menu Close

नगर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

नगर : काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या विद्यार्थी संघटनेच्या देशद्रोही कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासले. या देशद्रोही कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयासमोर हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने राष्ट्र्रीय हिंदू आंदोलन करून गृहविभागाचे उपचिटणीस श्री. राजू दिवाण यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर, हिंदु राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गेंटयाल यांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. पोलीस आणि आंदोलन परिसरातील रहिवासी बाहेर येऊन विषय गांभीर्याने ऐकत होते, तसेच रस्त्यावरून ये-जा करणारेही उभे राहून विषय ऐकत होते.

२. समाजातील काही व्यक्ती विषय समजून घेऊन निवेदनावर स्वाक्षर्‍या करत होते. घोषणांमुळे परिसरात उत्साह जाणवत होता.

३. ह.भ.प. क्षीरसागर महाराज यांचे वाहन पंक्चर होऊनही ते आंदोलनाला उपस्थित राहिले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *