Menu Close

हिंदुस्थान युनिलिव्हर आस्थापनाच्या विरोधातील आंदोलनाला पोलिसांनी अनुमती नाकारली

मुंबई : हिंदुस्थान युनिलिव्हर आस्थापनाने रंगपंचमी या हिंदूंच्या पवित्र उत्सवावर चित्रीत केलेल्या ‘सर्फ एक्सेल’ या कपडे धुण्याच्या पावडरच्या विज्ञापनामध्ये रंगपंचमीचा अन्य धर्मियांना त्रास होत असल्याचे दाखवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे चित्रीत केले आहे. याच्या निषेधार्थ हिंदु जनजागृती समिती आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने १० मार्च या दिवशी दादर रेल्वेस्थानकाच्या ठिकाणी निदर्शने करण्यात येणार होती. याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संबंधित माटुंगा पोलीस ठाण्यामध्ये रितसर अनुमतीचे पत्र दिले होते. आंदोलनाला १.३० घंटा असतांना आयत्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था यांचे कारण देत पोलिसांनी आंदोलनाला अनुमती नाकारली. त्यामुळे आंदोलन होऊ शकले नाही.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *