Menu Close

विश्‍व श्रीराम सेनेचे लालबाबू गुप्ता यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांच्याकडून भेट

डावीकडून श्री. रमेश शिंदे हे श्री. लालबाबू गुप्ता यांच्याशी चर्चा करतांना

चिंचवड (पुणे) : विश्‍व श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. लालबाबू गुप्ता यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी भेट घेतली. त्या वेळी हिंदुत्वावर होणारे आघात, त्यावरील उपाय आणि हिंदु राष्ट्र या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्या प्रसंगी श्री. गुप्ता यांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची, तसेच समितीच्या मार्गदर्शनाखाली कार्य करण्याची इच्छा प्रदर्शित केली. या वेळी श्री. गुप्ता यांनी श्रीरामाची प्रतिमा देऊन श्री. रमेश शिंदे यांचा सत्कार केला. विश्‍व श्रीराम सेनेचे विशेष करून उत्तर भारतात हिंदुत्वाचे कार्य चालू आहे. या व्यतिरिक्त संकेतस्थळाच्या माध्यमातूनही हिंदुजागृतीचे कार्य केले जात आहे. संघटनेच्या वतीने चालवले जाणार्‍या ‘व्हीएस्आर्एस् न्यूज’ या हिंदी साप्ताहिकात चिखली येथील सभेची प्रसिद्धी करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *