Menu Close

हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांचा मुख्य सूत्रधार आबिद पाशा याला अटक करा : हिंदुत्वनिष्ठांची मागणी

सरकारकडे अशी मागणी का करावी लागते ?

कथित आरोपांवरून हिंदुत्वनिष्ठांना तत्परतेने अटक करणारे कर्नाटकातील जे.डी.एस्.- काँग्रेस सरकार आणि अन्वेषण यंत्रणा धर्मांध गुन्हेगारांना मोकळे सोडतात, हे लक्षात घ्या !

१. खासदार प्रतापसिंह यांना निवेदन देतांना डावीकडून सर्वश्री शिवराम, संजय, गुरुप्रसाद गौडा, गिरीधर आणि मंजुनाथ

 

पोलीस आयुक्त सुब्रह्मण्येश्‍वर राव (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्री. गुरुप्रसाद गौडा आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ

म्हैसुरू (कर्नाटक) : हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या आणि त्यांच्यावरील प्राणघातक आक्रमणांचा सूत्रधार असणारा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा आबिद पाशा याला तत्परतेने अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीने अन्य हिंदु धर्माभिमान्यांसह म्हैसुरू येथील जिल्हाधिकारी अभीरामजी शंकर, पोलीस आयुक्त सुब्रह्मण्येश्‍वर राव आणि कोडगू येथील भाजपचे खासदार श्री. प्रतापसिंह यांना निवेदन दिले. या वेळी समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा, समितीचे श्री. शिवराम, श्री. गिरीधर, धर्मप्रेमी मंजुनाथ आणि श्रीराम सेनेचे श्री. संजय उपस्थित होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *