Menu Close

जबलपूर : हिंदू सेवा परिषदेच्या स्वरक्षण प्रशिक्षण शिबिरात हिंदु जनजागृती समितीकडून मार्गदर्शन

जबलपूर (मध्यप्रदेश) : येथील सरसवाही भागामध्ये हिंदू सेवा परिषदेकडून स्वरक्षण प्रशिक्षण शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीकडून या वेळी प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. विनय पानवळकर, श्री. हर्षद खानविलकर आणि समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे उपस्थित होते. या शिबिरामध्ये स्वरक्षणाचे महत्त्व, प्रशिक्षणासाठी साधनेची आवश्यकता आणि धर्माच्या दृष्टीने समाजाचे वर्तन कसे असावे, या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी ३० हून अधिक धर्माभिमानी यात सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचा उद्देश, प्रस्तावना आणि स्वागत हिंदू सेवा परिषदेचे श्री. निखिल कनौजिया, श्री. धर्मेंद्र ठाकुर, श्री. धनराज मानाठाकुर यांनी, तसेच सूत्रसंचालन श्री. सौरभ जैन, श्री. मुकेश बर्मन आणि श्री. नितीन सोनपल्लि यांनी केले. समारोपाचे मार्गदर्शन हिंदू सेवा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अतुल जेसवानी आणि समितीचे श्री. योगेश व्हनमारे यांनी केले.

शिबिराच्या वेळी सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन, तसेच समितीच्या राष्ट्र अन् धर्म विषयक फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *