Menu Close

धर्मांधाकडून हिंदु असल्याचे खोटे सांगून हिंदु युवतीची फसवणूक !

उमरगा (जिल्हा धाराशिव) येथे लव्ह जिहादची घटना उघडकीस

हिंदु युवतींनो, धर्मांधांचे षड्यंत्र जाणा. सतर्क होऊन स्वधर्माचे पालन केल्यास अशी वेळ तुमच्यावर येणार नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

उमरगा (जिल्हा धाराशिव) : अस्लम जमादार या युवकाने हिंदु धर्माप्रमाणे वर्ष २०१२ मध्ये ‘संतोष’ असे खोटे नाव सांगून जिल्ह्यातील हिंदु पीडित मुलीशी विवाह केल्याची घटना समोर आली आहे, तसेच त्याला यापूर्वी २ पत्नी असल्याचेही त्याने लपवले आहे. यावरून ही ‘लव्ह जिहाद’ची घटना असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणी अस्लमविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हा विवाह पीडितेने स्वेच्छेने केल्यानंतर ते २ वर्षे भाग्यनगर शहरात भाड्याने रहात होते. त्यानंतर दोघे पुन्हा वर्ष २०१५ मध्ये उमरगा येथे राहू लागले. यानंतर ६ महिन्यांनी पीडितेला पती हा हिंदु नसून मुसलमान असल्याचे समजले. अस्लमने पीडितेला मारहाण करत मुसलमान धर्म स्वीकारण्यास सांगितले. त्यामुळे पीडितेने धर्मांतर करून मुसलमान धर्माप्रमाणे पतीशी पुन्हा लग्न केले. पीडितेने कमवलेले पैसे अस्लम मागत असे आणि ते न दिल्यास शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याची तक्रार पीडितेने उमरगा पोलीस ठाण्यात दिली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


अल्पवयीन मुलींना देहव्यापारासाठी परदेशात पाठवण्याचा प्रयत्न करणार्‍या ४ धर्मांधांना मुंबईत अटक

हा लव्ह जिहादचा प्रकार होय, हे हिंदू आणि पोलीस कधी लक्षात घेणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मुंबई : गुजरातमधील २ अल्पवयीन मुलींना बनावट पारमत्र सिद्ध करून अमेरिकेत देहव्यापारासाठी धाडण्याचा प्रयत्न करणार्‍या ४ धर्मांधांना वर्सोवा पोलिसांनी अटक केले. आमीर खान, ताजुद्दीन खान, रिझवान चोटाणी आणि अफझल शेख अशी या धर्माधांची नावे आहेत. देहव्यापारासाठी पाठवण्यात येत असलेल्या या दोन्ही मुली गुजरात राज्यातील कर्णावती येथील रहाणार्‍या आहेत. या मुलींचे चेहरे रिझवान नावाच्या एका मुसलमान व्यक्तीच्या मुलींच्या चेहर्‍याशी मिळते-जुळते करण्यासाठी त्यांना वार्सोवा येथील एका पार्लरमध्ये मेकअप करण्यासाठी नेण्यात आले होते. त्यांचे बनावट पारपत्र सिद्ध करून त्यांना अमेरिकेत पाठवण्याचा धर्मांधांचा डाव होता; मात्र पार्लरमधील कर्मचार्‍यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना दूरध्वनी करून त्याविषयी माहिती दिली. पोलिसांनी या चारही धर्मांधांना अटक केले असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


धर्मांध पोलीस हवालदाराकडून महिला पोलिसाचा भर रस्त्यात विनयभंग !

  • स्वतःच गुंडांप्रमाणे वागणारे, असे पोलीस म्हणजे खात्यास कलंक आहेत !
  • आपल्या सहकार्‍यासमवेत असभ्य वर्तन करणारे धर्मांध पोलीस हवालदार नागरिकांशी कसे वागत असतील, याची कल्पना येते ! अशा पोलिसांवर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी महिला संघटना पुढाकार का घेत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मुंबई : रस्त्यावरील टवाळखोरांप्रमाणे पाठलाग करत पोलीस हवालदार अफसल मुलानीने महिला पोलीस शिपायाचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना शहरातील मलबार हिल येथे घडली. (शिस्तीची चाड नसणार्‍या अशा धर्मांध हवालदाराला ‘पोलीस’ कसे म्हणावे ?- संपादक, दैनिक सनातन प्रभात)मुलानी संबंधित महिला अधिकार्‍यासमवेत सतत भ्रमणभाष करून आणि लघुसंदेश पाठवून संपर्कात रहाण्याचा आटापिटा करत होता. याविषयी त्याला खडसावल्यावरही त्याचे त्रास देणे चालूच होते. नोव्हेंबर मासात रस्त्यात हात पकडून त्याने संबंधित महिला पोलिसासमवेत असभ्य वर्तन केले. त्याच्या संदेशांकडे दुर्लक्ष केल्यावर पोलीस दलात अपकीर्ती करण्याची त्याने धमकी संबंधित महिला पोलिसाला दिली (धर्मांधांची मुजोर आणि उद्दाम वृत्ती पहा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)  या प्रकरणी तक्रारीनंतर पोलीस हवालदार मुलानीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा प्रविष्ट केला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *