सातारा पोलिसांकडून हिंदु जनजागृती समितीचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

सातारा : समाजात कायदा आणि सुव्यस्थेचे आबाधित ठेवत धर्मरक्षणाची कृती करणार्‍या हिंदु जनजागृती समितीची सातारा पोलिसांनी दखल घेऊन २८ फेब्रुवारी या दिवशी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले आहे.

१८ फेब्रुवारी या दिवशी श्रीक्षेत्र संगम माहुली येथील कृष्णा नदीच्या पुलाजवळ ऐन शिवजयंतीच्या तोंडावर समाजात तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण व्हावा, यासाठी काही समाजकंटकांकडून श्रीगणेश मूर्तींची विटंबना करण्यात आली; मात्र हिंदु जनजागृती समितीच्या जागृत धर्माभिमानी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने विटंबना झालेल्या मूर्तींचे विधिवत पूजा आणि आरती करून कृष्णा नदीमधये विसर्जन केले.

या मोहिमेमध्ये हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुनील दळवी, विनायक कुलकर्णी, दीपक डाफळे, सुनील लोंढे, गणेश आनंदे, राहुल कोल्हापुरे, मंगेश निकम, संजय मोरे आणि शहर पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाचे अधिकारी श्री. राहुल खाडे, श्री. जोपले सहभागी झाले होते.

हिंदु जनजगृती समितीच्या सहकार्याने राष्ट्ररक्षणाचे कार्य करणार – श्री. सारंगकर, पोलीस निरिक्षक, शहर पोलीस ठाणे

हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी नि:स्वार्थपणे करत असलेले कार्य मी आणि माझ्या सहकार्यांनी प्रत्यक्ष जवळून पाहिले आहे. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे आणि कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे अल्प आहे. समिती नेहमीच चांगले उपक्रम राबवते. जिथे शक्य आहे, तिथे पोलिसांचेही सहकार्य हिंदु जनजागृती समितीला निश्‍चितच लाभेल. पोलिसांनाही राष्ट्ररक्षणाच्या उपक्रमांत समितीचे सहकार्य लाभावे, अशी विनंतीही श्री. सारंगकर यांनी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment








Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​