Menu Close

हरियाणामध्ये धर्मांधाकडून हिंदु महिलेवर बलात्कार, बलपूर्वक धर्मांतर आणि विवाह करून अत्याचार

लव्ह जिहादची आणखी एक घटना उघडकीस

केंद्र किंवा राज्य सरकारे अशा घटनांना रोख लावण्यासाठी कधी प्रयत्न करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

हिसार (हरियाणा) : हरियाणा राज्यातील हिसारमध्ये लव्ह जिहादची एक घटना नुकतीच उघडकीस आली. एका धर्मांधाने हिंदु महिलेवर बलात्कार केला. तिचे बलपूर्वक धर्मांतर घडवून आणून तिच्याशी विवाह केला. नंतर धर्मांध पतीच्या बंधूंनी आणि मेहुण्याने त्या हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार केला, तसेच धर्मांध पतीच्या कुटुंबियांनी तिचे सर्व दागिने आणि पैसे लुटले. पीडित हिंदु महिलेने याविषयी हिसार पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे, असे वृत्त ‘हिंदुपोस्ट’ वृत्तसंकेतस्थळाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे.

१. पीडित ३६ वर्षीय हिंदु महिला तिची एक मुलगी आणि आई यांच्यासह हिसारमधील पटेलनगर येथे रहात होती. त्याच भागात आरोपी धर्मांधाचे कपड्यांचे दुकान होते. हा धर्मांध महिलेच्या घरी यायचा.

२. डिसेंबर २०१४ मध्ये पीडित हिंदु महिला घरात एकटीच असल्याची संधी साधून तो तिच्या घरात घुसला आणि सुरीचा धाक दाखवून त्याने तिच्यावर बलात्कार केला.

३. पीडित महिलेने या घटनेविषयी तिच्या आईला सांगितले. त्यांनी त्या धर्मांधांला जाब विचारल्यावर त्याने अविवाहित असल्याचे खोटेच सांगून तिच्याशी विवाह करण्याचे आश्‍वासन दिले.

४. विवाहाचे खोटे आश्‍वासन देऊन त्या मुसलमान व्यक्तीने तिच्यावर बलात्कार करणे चालूच ठेवले. त्यानंतर त्या मुसलमान व्यक्तीने हिंदु महिलेचे बलपूर्वक धर्मांतर घडवून आणले आणि इस्लामी पद्धतीने तिच्याशी विवाह केला.

५. विवाह करून धर्मांध पतीच्या घरी गेल्यावर हिंदु महिलेला तो विवाहित असल्याचे लक्षात आले. ३ जून २०१५ या दिवशी ती एकटीच घरी असतांना धर्मांधाचे ३ बंधू आणि १ मेहुणा यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

६. धर्मांधाने हिसार येथील सदनिका विकली आणि पहिल्या पत्नीसह तो बुलंदशहर येथे रहायला गेला. त्याने हिंदु महिलेचे १२ लक्ष ५० सहस्र रुपये लुटले. हिंदु महिला पतीकडे रहायला गेली असता तिला हाकलून लावण्यात आले.

७. हिसार पोलीस ठाण्यात पीडित हिंदु महिलेने धर्मांध आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. यासाठी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल तिला साहाय्य करत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *