Menu Close

हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाह करणार्‍या धर्मांध तरुणाकडून इस्लाम स्वीकारण्यासाठी तिच्यावर अत्याचार

किशनगंज (बिहार) येथील ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण

‘आंतरधर्मीय विवाहांना ‘लव्ह जिहाद’ असल्याचे एका षड्यंत्राद्वारे दाखवण्यात येत आहे’, असे म्हणणारे भाजपचे केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुफ्तार अब्बास नक्वी आता काही बोलतील का ?

किशनगंज (बिहार) – येथील गलगलिया इदगाह टोला येथे रहाणार्‍या महंमद राजा उपाख्य किना याने विवाहित असतांनाही महाविद्यालयीन हिंदु विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्याशी विवाह केल्याचे आणि नंतर तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या अत्याचारामुळे सासरमधून पळून येऊन या तरुणीने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.

१. १३ मे या दिवशी महंमद या तरुणीला देहली येथे घेऊन गेला होता. तेथे त्याने तिच्याशी विवाह केला. तरुणी घरातून बेपत्ता झाल्यावर तिच्या पालकांनी तक्रार प्रविष्ट केली होती. पोलिसांच्या दबावानंतर महंमद या तरुणीला घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाला होता; मात्र तरुणीने महंमदच्या बाजूने जबाब दिल्यावर पोलिसांनी तिला त्याच्या सोबत जाण्यास अनुमती दिली.

२. यानंतर तिला महंमदच्या परिवाराने २ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी तिचा छळ चालू केला. तसेच धर्मांतरासाठी अत्याचार केला जात होता. तिला बांधून ठेवण्यात येत होते. यानंतर तिने येथून पलायन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *