Menu Close

पुण्याच्या महापौर सौ. मुक्ता टिळक यांची सदिच्छा भेट

महापौर सौ. मुक्ता टिळक (सर्वांत डावीकडे) यांना ग्रंथ भेट देतांना सौ. विजया भिडे आणि श्री. कृष्णाजी पाटील

पुणे : दिवाळीनिमित्त सनातन संस्था व हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुण्याच्या महापौर सौ. मुक्ता टिळक यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. सनातन संस्थेच्या सौ. विजया भिडे यांनी महापौर सौ. टिळक यांना दिवाळीचे शुभेच्छापत्र आणि सनातनच्या ६ लघुग्रंथांचा संच भेट दिला. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील हेही उपस्थित होते. महापौरांशी चर्चा करतांना श्री. पाटील यांनी सिंहगडाच्या डागडुजीच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराविषयी त्यांना अवगत केले. ‘सिंहगडाच्या डागडुजीच्या कामात भ्रष्टाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी’ या आशयाचे निवेदनही महापौरांना देण्यात आले. हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असणारे फटाके फोडल्यामुळे होणारी विटंबना रोखण्यासाठी, तसेच चिनी फटाक्यांवर बंदी घालण्यासंदर्भात समिती करत असलेल्या जागृतीविषयी सांगून महापौर सौ. टिळक यांना त्यासंदर्भातील निवेदनही त्यांना देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *