Menu Close

अंबरनाथ (ठाणे) येथे आणखी एक लव्ह जिहादचे प्रकरण उघडकीस !

ठाणे : विवाहित तरुणाने एका अल्पवयीन तरुणीशी ओळख करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. जावेद (वय २३ वर्ष रा. कल्याण पूर्व) असे धर्मांध आरोपीचे नाव आहे.

अंबरनाथ परिसरात साडेसतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीशी आरोपी जावेदने मैत्री करून तिला प्रेमाच्या आणाभाका दिल्या. ९ ऑगस्ट या दिवशी रात्री ८ वाजता सुमाराला तिला पळवून नेले. त्या वेळी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार घरच्यांनी नोंदवली होती. पोलीस आणि पीडित मुलीचे नातेवाईक तिचा शोध घेत होते. ती पीडित मुलगी जावेदसोबत आढळून आली. याविषयी पोलिसांना समजताच त्यांनी त्याला कह्यात घेतले. त्या मुलीवर २० दिवस आरोपी जावेदने अत्याचार केल्याचे उघडकीस येत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *