Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून भग्नावस्थेतील श्री गणेशमूर्तीचे विसर्जन !

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) : हिंदु जनजागृतीचे कार्यकर्ते श्री. संजय घाटगे आणि श्री. शिवराज घाटगे हे २६ ऑगस्ट या दिवशी अंकली पुलाजवळ  कृष्णा नदीत दीड दिवसांच्या श्री गणेशाचे विसर्जन करण्यासाठी गेले होते. त्या वेळी एका अज्ञाताने श्री गणेशाची भग्नावस्थेत श्रीगणेशमूर्ती विसर्जन न करता तिथेच काठावर ठेवलेली आढळून आली. या वेळी श्री गणेशमूर्तीची पुढील विटंबना टाळण्यासाठी श्री. संजय आणि श्री. शिवराज घाटगे यांनी श्री गणेशाची मूर्ती नदीत विसर्जन केली. (हिंदूंना आज धर्मशिक्षण नसल्याने हिंदूंकडून मूर्ती विसर्जन न करता काठावर सोडून जाण्याच्या कृती होत आहेत ! हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना धर्मशिक्षण असल्याने ते धर्महानी रोखण्यात पुढाकार घेतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *