Menu Close

पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) (वय ८० वर्षे) यांनी ४० फूट उंचीवर चढून मंदिरावर कलशाची स्थापना केली !

तरुणांना लाजवेल असा उत्साह असणारे प्रखर धर्मनिष्ठ-राष्ट्रभक्त पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) !

कलशाची स्थापना करण्यासाठी जातांना पू. भिडेगुरुजी (डावीकडे)
४० फूट उंचीवर चढून कलशाची स्थापना करतांना पू. भिडेगुरुजी (उजवीकडे)

शिराळा (जिल्हा सांगली)  – तालुक्यातील कापरी येथील नव्याने बांधलेल्या मारुति मंदिराचा कलशारोहण समारंभ श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्या हस्ते नुकताच पार पडला. पूजन करून झाल्यावर गावातील तरुणांनी हा कळस शिखरावर नेऊन स्थापन करण्याचे ठरवले; मात्र गुरुजींनी ते मान्य केले नाही. पूजन झाल्यावर पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी स्वत: कळस उचलला आणि बांबूच्या शिडीवरून ४० फूट उंचीच्या शिखरावर स्वत: कळस घेऊन वर चढले आणि त्याची स्थापना केली. पू. भिडे (गुरुजी) यांचे वय सध्या ८० वर्षे असून त्यांची ही कृती तरुणांना लाजवेल अशीच होती. (वयाच्या ८० व्या वर्षी स्वत: ४० फूट उंचीवर चढून कलशाची स्थापना करणारे पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) हे इतरांसाठी आदर्शवतच आहेत ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Read more on Hindu Organisations

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *