Menu Close

ऋषिकेश (उत्तराखंड) : जगद्गुरु केरळ आश्रमाचे महामंडलेश्‍वर प.पू. स्वामीजी अभिषेक चैतन्यजी यांची हिंदु जनजागृती समितीकडून भेट

महामंडलेश्‍वर प.पू. स्वामीजी अभिषेक चैतन्यजी (उजवीकडे) यांना दैनिक भेट देतांना समितीचे श्री. सुनील घनवट आणि मागे ह.भ.प. ज्ञानेश्‍वर माऊली शिंदे

श्रीक्षेत्र आळंदी : ऋषिकेश (उत्तराखंड) येथील जगद्गुरु केरळ आश्रमाचे महामंडलेश्‍वर प.पू. स्वामीजी अभिषेक चैतन्यजी यांची समितीचे श्री. सुनील घनवट यांनी भेट घेतली. त्या वेळी त्यांना दैनिक सनातन प्रभात भेट देण्यात आले. तसेच समितीचा लव्ह जिहाद हा ग्रंथही भेट देऊन त्यांना लव्ह जिहादच्या संकटाविषयी अवगत करण्यात आले.

२३ मार्चला दुपारी रामानंदाचार्य रामराजू महाराज यांचे रामकथेवर निरूपण झाले. त्यानंतर ऋषिकेश (उत्तराखंड) येथील केरळ आश्रमाचे महामंडलेवश्‍वर प.पू. स्वामीजी अभिषेक चैतन्यजी यांचे मार्गदर्शन झाले. ते म्हणाले, परमेश्‍वराच्या दर्शनाने सर्व दुःखांची राखरांगोळी होते आणि सुखाची प्राप्ती होते. या सुखाला स्थळ, काळ यांचे बंधन नसते. संतांच्या कृपेनेच हे होऊ शकते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *