Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा उज्जैन येथे सन्मान

सुप्रसिद्ध ज्योतिर्विद, पंचांगकर्ते आणि अनुष्ठानमण्डपम्-ज्योतिष अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित श्यामनारायण व्यास यांच्याकडून सन्मान

pu_kaka_sanman
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे (मध्यभागी) यांचा जय बाबा गुमानदेव हनुमानाची प्रतिमा देऊन सन्मान करतांना पंडित श्यामनारायण व्यास (उजवीकडे) आणि त्यांचे सुपुत्र पंडित चंदन व्यास (डावीकडे)

उज्जैन – सुप्रसिद्ध ज्योतिर्विद, पंचांगकर्ते आणि अनुष्ठानमण्डपम्-ज्योतिष अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित श्यामनारायण व्यास आणि त्यांचे सुपुत्र ज्योतिर्विद, सिंहस्थ महाकाल पंचांगाचे प्रमुख संपादक आणि अखिल भारतीय ब्राह्मण युवा पारमार्थिक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित चंदन व्यास यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांनी जय बाबा गुमानदेव हनुमानाची प्रतिमा देऊन पू. डॉ. पिंगळे यांचा सन्मान केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *