Menu Close

माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे (पाटील) यांच्याकडून अनिल धीर आणि रमेश शिंदे यांचा सत्कार

पुणे : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे आणि ओडिशा येथील माहिती अधिकार कार्यकर्ते तथा भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर यांनी नुकतीच येथील माहिती सेवा समितीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी श्री. शिंदे आणि श्री. धीर यांनी माहिती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे (पाटील) यांच्याशी माहिती अधिकार कायदा वापरण्याच्या संदर्भात चर्चा केली.

या वेळी माहिती सेवा समितीच्या वतीने श्री. वारघडे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हे समितीने प्रकाशित केलेले पुस्तक श्री. धीर आणि श्री. शिंदे यांना भेट देऊन त्यांचा सत्कार केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *