Menu Close

हिंदू आणि हिंदु सैनिक पाकिस्तानला उद्ध्वस्त करतील !

आप्पाचीवाडी (जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथांच्या भाकणुकीतील भविष्यवाणी

belgaon_shri_palakhi
पालखी प्रदक्षिणेनंतर प्रतिष्ठापना केलेली श्रींची मूर्ती

आप्पाचीवाडी (जिल्हा बेळगाव) : महाराष्ट्राचे सैनिक मृत्यूला घाबरणार नाहीत. हिंदू आणि हिंदु सैनिक पाकिस्तानला उद्ध्वस्त करतील. सीमा प्रश्‍न राज्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या चर्चेत राहील. सीमा भागात मोठा गोंधळ माजेल. स्त्रीवर्ग राजकारणात बाजी मारेल. उसासाठी राज्यात मोठी आंदोलने छेडतील. भगवा झेंडा राज्य करेल. काँग्रेस पक्षात दोन पक्ष पडून झंझावात लागेल. पंच लोक दोन्हींकडून लाच घेऊन भांडणे लावतील, अशी भविष्यवाणी आप्पाचीवाडी (जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथांच्या यात्रेच्या वेळी करण्यात आली.

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक (भविष्यवाणी) ! आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ मंदिरात १९ ऑक्टोबर या दिवशी पहाटे ५ वाजता श्री. भगवान डोणे महाराज (वाघापुरे) यांच्या माध्यमातून ही भाकणूक सांगण्यात आली. या वेळी आप्पाचीवाडी, कुर्ली, रायबाग, चिक्कोडी, निपाणी, संकेश्‍वर, कारवार, कोल्हापूर यांसह आदी गावांतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Read more on Hinduism

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *